Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पुणे विभागाला पहिल्यांदाच महिला विभागीय आयुक्त

Solapur Mirror by Solapur Mirror
May 15, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
पुणे विभागाला पहिल्यांदाच महिला विभागीय आयुक्त
0
SHARES
118
VIEWS

पुणे ; गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु आहे, जे अजूनही सुरु आहे. गुरुवारी पुन्हा एकदा चार बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यासह गोंदिया, नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी या नव्या अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य प्रशासनाने गुरुवारी आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त आणि क्रीडा आयुक्तांसह वरिष्ठ स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची मुंबईत ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

​डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (२००८ बॅच) यांनी पुणे विभागाच्या आयुक्तपदी राहून अनेक महत्त्वाचे निर्णय मार्गी लावले होते. आता त्यांच्यावर मंत्रालयातील ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागी आता शीतल तेली-उगळे (२००९ बॅच) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. आता त्या पुणे विभागाच्या नव्या विभागीय आयुक्त असतील. दुसरीकडे, वैद्यकीय रजेवर असलेले दीपक सिंगला (२०१२ बॅच) यांची पुण्याच्या क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी वर्णी लागली आहे. विदर्भातही प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनांतम एम. (२०२० बॅच) यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. प्रशासकीय कामात गती आणण्याच्या उद्देशाने हे फेरबदल करण्यात आल्याचे समजते.

  • कोणत्या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या?
    १. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (IAS:२००८)
    ​पूर्वी कार्यरत: विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.
    ​नवीन बदलीचे ठिकाण: सचिव (ग्रामविकास आणि पंचायत राज), ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
  • ​२. श्रीमती शीतल तेली-उगळे (IAS:२००९)
    पूर्वी कार्यरत: आयुक्त, क्रीडा आणि युवक सेवा, पुणे.
    ​नवीन बदलीचे ठिकाण: विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.
  • ​३. श्री. दीपक सिंगला (IAS:२०१२)
    पूर्वी कार्यरत: वैद्यकीय रजेवर.
    ​नवीन बदलीचे ठिकाण: आयुक्त, क्रीडा आणि युवक सेवा, पुणे.
  • ​४. श्री. मुरुगनांतम एम. (IAS:२०२०)
    पूर्वी कार्यरत: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया.
    ​नवीन बदलीचे ठिकाण:अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर.
Previous Post

प्रभागातील प्रश्नांसाठी नगरसेवक दीपक जमादार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धाव

Next Post

सोलापूर शहर पोलिस उपआयुक्तपदी वृष्टी जैन यांची वर्णी

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
सोलापूर शहर पोलिस उपआयुक्तपदी वृष्टी जैन यांची वर्णी

सोलापूर शहर पोलिस उपआयुक्तपदी वृष्टी जैन यांची वर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In