Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह! दक्षिण सोलापूर पंचायत समितीत खळबळ

Solapur Mirror by Solapur Mirror
June 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह! दक्षिण सोलापूर पंचायत समितीत खळबळ

सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा सोमनाथ पटणे (उर्फ वर्षा शिवाजी कोनाळे) यांच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील जात प्रमाणपत्रासंदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धाराशिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांच्या सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करत ते अवैध असल्याचे नमूद केल्याची माहिती समोर आली असून, संबंधित प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याबाबत कारवाईचे निर्देश दिल्याची चर्चा सुरू आहे.या प्रकरणाची सुरुवात होतगी स्टेशन परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर झाली असल्याचे सांगितले जाते.

तक्रारीनंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रकरणाची सुनावणी घेत विविध शासकीय कागदपत्रे, अभिलेख तसेच उपलब्ध नोंदींची तपासणी केली. निवडणूक अर्जासोबत वर्षा शिवाजी कोनाळे (मूळ रा. फणेपूर, ता. उमरगा) यांनी राज्याच्या ओबीसी यादीतील अनुक्रमांक १९० वरील ‘वाणी’ जातीचे प्रमाणपत्र सादर केल्याची नोंद समितीसमोर होती.माहितीनुसार, या संदर्भात समितीने दोन वेळा सुनावणी निश्चित केली होती. मात्र, दोन्ही वेळा संबंधितांकडून उपस्थिती राहिली नसल्याची नोंद असल्याचे समजते. त्यामुळे उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे समितीने पुढील प्रक्रिया सुरू ठेवली.तपासादरम्यान प्रमाणपत्रावरील डिजिटल स्वाक्षरी, कार्यालयीन शिक्का तसेच इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात आली.

संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झाले नसल्याचे लेखी स्वरूपात कळविल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच प्रमाणपत्रावरील बारकोड तपासणीत संबंधित माहिती उपलब्ध होत नसल्याची बाबही निदर्शनास आल्याचे सांगितले जात आहे. या सर्व बाबींच्या आधारे समितीने संबंधित प्रमाणपत्राबाबत निर्णय घेतल्याचे समजते.विशेष म्हणजे, बोरामणी पंचायत समिती गणातून झालेल्या निवडणुकीत वर्षा पटणे यांनी २ हजार १४३ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांना ६ हजार ३०७ मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी उमेदवारांना ४ हजार १६४ मते मिळाली होती. विजयानंतर त्यांची पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली होती. आता या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत तसेच पुढील प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

आदिला नदी-नाला वाद चिघळला; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन..!

Next Post

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In