Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शरद पवार गटाला दिलासा; निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

Solapur Mirror by Solapur Mirror
November 13, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
शरद पवार गटाला दिलासा; निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले
0
SHARES
9
VIEWS

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या ‘पिपाणी’ (ट्रम्पेट) चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला अखेर निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी’ (राष्ट्रवादी) आणि ‘पिपाणी’ (अपक्ष) या दोन्ही चिन्हांमध्ये नावाचे व दर्शनाचे साधर्म्य असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या नामसाधर्म्यामुळे पक्षाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाली. तसेच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 9 उमेदवार याच चिन्हामुळे पडल्याचा दावा पक्षाने केला होता.

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाकडून ‘पिपाणी’ हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हांच्या यादीतून त्वरित वगळण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. निवडणूक आयोगाने अखेर राष्ट्रवादीची मागणी मान्य करत आपल्या 194 मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ (ट्रम्पेट) हे चिन्ह गोठवले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांचा संभ्रम टळणार आहे.

दरम्यान, निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचे चित्र खूप वेगळे असते. पण असो! देर आए दुरुस्त आए..! असे म्हणत रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे.

Previous Post

प्रभाग क्रमांक 26 मध्ये राजश्री चव्हाण यांनी आणली विकासाची जलगंगा

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार; केंद्राने मागविला प्रस्ताव

Related Posts

३३ वर्षांची जलकोंडी; मानखुर्दच्या प्रश्नाला अखेर ‘रेल्वे’ची दखल!
महाराष्ट्र

३३ वर्षांची जलकोंडी; मानखुर्दच्या प्रश्नाला अखेर ‘रेल्वे’ची दखल!

July 23, 2026
१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक
राजकारण

१४ बस, १०२ कामगार नेमके कुठे?; स्थायी समितीत चेतन नरोटे आक्रमक

July 21, 2026
आदिवासी पारधी समाजातील युवकांना नोकरीची संधी देण्याचे एमडी औंडीकर यांचे निर्देश
राजकारण

आदिवासी पारधी समाजातील युवकांना नोकरीची संधी देण्याचे एमडी औंडीकर यांचे निर्देश

June 22, 2026
सोलापूर विमानतळावर घाणीचे साम्राज्य; प्रशासन झोपेत का?
महाराष्ट्र

सोलापूर विमानतळावर घाणीचे साम्राज्य; प्रशासन झोपेत का?

May 10, 2026
‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्र

‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

April 10, 2026
वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे
राजकारण

वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे

April 6, 2026
Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार; केंद्राने मागविला प्रस्ताव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार; केंद्राने मागविला प्रस्ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025