Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ओम गर्जना चौक–बॉम्बे पार्क रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

Solapur Mirror by Solapur Mirror
June 29, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ओम गर्जना चौक–बॉम्बे पार्क रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर, : प्रभाग क्रमांक २६ मधील ओम गर्जना चौक ते बॉम्बे पार्क दरम्यानचा रस्ता ड्रेनेजच्या कामानंतर अनेक महिन्यांपासून उखडलेल्या अवस्थेत होता. ड्रेनेजचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करणे अपेक्षित असतानाही संबंधित ठेकेदाराने ते न केल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. अखेर नागरिकांच्या तक्रारी आणि नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

रस्ता उखडलेला असल्यामुळे पादचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने किरकोळ अपघातांची संख्या वाढली होती. धुळीचे प्रमाण वाढल्याने परिसरातील अनेक नागरिकांना श्वसनाच्या तक्रारीही निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. या समस्येबाबत नागरिकांनी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांची भेट घेऊन समस्या मांडली. त्यानंतर २२ मे २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.

रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले. कार्यकाळ संपल्यानंतरही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या सक्रिय असल्याचे सांगत स्थानिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Previous Post

जिल्ह्यात ९१.६६ टक्के पल्स पोलिओ लसीकरण

Next Post

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025