Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बोगस नियुक्तीवर शिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल; उपसंचालकांचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात

Solapur Mirror by Solapur Mirror
July 14, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बोगस नियुक्तीवर शिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल; उपसंचालकांचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात

उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांच्याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष

सोलापूर : करमाळा तालुक्यातील अवधूत विद्यालय, वांगी क्र. २ येथील कथित बोगस शिपाई नियुक्ती, मान्यता आणि शालार्थ आयडी प्रकरणात जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी सविस्तर चौकशी अहवाल सादर करून संबंधित नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे नमूद करत कठोर कारवाईची स्पष्ट शिफारस केली आहे. त्यामुळे आता पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी आपल्या अहवालात शासन निर्णय, आकृतिबंध तसेच महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली, १९८१ मधील नियमांचा संदर्भ देत संबंधित कालावधीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही संबंधित संस्थेने अधिकारांचा गैरवापर करून नियुक्ती केल्याचे नमूद करण्यात आले असून संबंधित मान्यता रद्द करून संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तसेच उच्च न्यायालयाची दिशाभूल करून शालार्थ आयडी मिळाल्याचा मुद्दाही अहवालात उपस्थित करण्यात आला आहे.दरम्यान, याच अवधूत विद्यालयातील मुख्याध्यापकांचा कथित वादग्रस्त व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे. या व्हिडिओची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शाळेतील सर्व प्रशासकीय व शैक्षणिक बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, एका बाजूला मुख्याध्यापकांच्या कथित व्हायरल व्हिडिओची चौकशीची मागणी, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणाधिकारी स्तरावर बोगस नियुक्ती व मान्यता रद्द करण्याची स्पष्ट शिफारस झाल्याने संबंधित संस्थेवरील दबाव वाढला आहे.विशेष म्हणजे, शिक्षणाधिकारी यांनी नियमभंग झाल्याचे नमूद करून संबंधित मान्यता रद्द करण्यासह दंडात्मक कारवाईची शिफारस केली असल्याने आता अंतिम निर्णयाची जबाबदारी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांच्यावर आली आहे.

आता सर्वात मोठा सवाल असा आहे की, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या स्पष्ट शिफारशी आणि सादर केलेल्या अहवालानुसार शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे तातडीने कठोर कारवाई करतील का? तसेच मुख्याध्यापकांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणातही कायदेशीर कार्यवाहीचे आदेश देतील का? की हे गंभीर प्रकरणही प्रशासकीय विलंबात अडकून राहणार? या प्रश्नाचे उत्तर येत्या काळात होणाऱ्या निर्णयातून स्पष्ट होणार असून, संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष आता पुणे विभागाकडे लागले आहे.

“मुख्याध्यापकाचा कथित वादग्रस्त व्हिडिओ वायरल झाल्यानंतर शिक्षक सेने कडून चौकशीची मागणी केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी मे महिन्यात मान्यता रद्द केल्याची शिफारस संघटनेला दिलेली आहे. परंतु उपसंचालक संबंधितांवर कारवाईचे आदेश देत नाहीत तोपर्यंत शिक्षक सेना पाठपुरावा करत राहील. न्याय न मिळाल्यास आंदोलन करू.”

Tags: जिल्हा परिषदडॉ. गणपत मोरेमाध्यमिक शिक्षण विभागशिक्षण आयुक्तशिक्षण उपसंचालकशिक्षणाधिकारीसचिंद्र सिंगसचिन जगताप
Previous Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची अभिनव कामगिरी ; ‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्पाची राज्यभर चर्चा

Next Post

स्व. अजित पवार यांच्या जयंतीला शासकीय मान्यता; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
स्व. अजित पवार यांच्या जयंतीला शासकीय मान्यता; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

स्व. अजित पवार यांच्या जयंतीला शासकीय मान्यता; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In