Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरसह महाराष्ट्रात ओबीसीसाठी सोमवारी होणार आरक्षण

Solapur Mirror by Solapur Mirror
November 15, 2025
in Uncategorized
0
सोलापूरसह महाराष्ट्रात ओबीसीसाठी सोमवारी होणार आरक्षण
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बदल केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता सोलापूरसह राज्यातील ८ महापालिकांतील ओबीसी व खुल्या प्रवर्गातील आरक्षणाच्या सोडतीही पुन्हा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ११ जानेवारी रोजी राज्यातील मनपाच्या प्रभागनिहाय आरक्षणाची प्रारुप सोडत जाहीर झाली होती. त्यात ओबीसी प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली होती.

मात्र आता नवी मुंबई, उल्हासनगर, पनवेल, मालेगाव, जळगाव, सोलापूर, इचलकरंजी आणि जालना या महापालिकांतील ओबीसी व सर्वसाधारण या दोन्ही प्रवर्गातील आरक्षणाची पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामागचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता सोलापूरमधील सोडत १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार असल्याचे कळवले आहे.

२०१७ मध्ये सोलापूर मनपाची निवडणूक झाली होती. तेव्हा एकूण १०२ नगरसेवकांच्या जागांपैकी ओबीसींसाठी २८ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५७ जागा आरक्षित झाल्या होत्या. यंदाही त्याच धर्तीवर आरक्षण काढण्यात आली, फक्त प्रभाग बदलले होते. मात्र या बदलात ओबीसींसाठी २८ ऐवजी २७ जागाच आरक्षित ठेवण्यात आल्या. तर सर्वसाधारण प्रवर्गातील एक जागा वाढून त्या ५७ऐवजी ५८ करण्यात आल्या. यात ओबीसी महिलांसाठी १४ तर खुल्या गटातील महिलांसाठी २८ जागा आरक्षित होत्या. ओबीसींची एक जागा घटली तर खुल्या प्रवर्गाची वाढली होती. आता फेररचनेत ओबीसींची जागा वाढवली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कार्यक्रमास संबंधित जनप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक नागरिक तसेच माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Previous Post

महापालिका कर विभागातील ६४ वसुली लिपिकांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड !

Next Post

बिहार निवडणुकीत महिलांना 10 हजार वाटल्याने NDA चा विजय; शरद पवार यांचा दावा

Related Posts

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’;  नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!
Uncategorized

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

August 6, 2026
सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!
Uncategorized

सोलापूरच्या टॉवेल-चादरींना मिळणार ‘सरकारी’ आधार!

July 28, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
Next Post
बिहार निवडणुकीत महिलांना 10 हजार वाटल्याने NDA चा विजय; शरद पवार यांचा दावा

बिहार निवडणुकीत महिलांना 10 हजार वाटल्याने NDA चा विजय; शरद पवार यांचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In