Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा क्षयरोगमुक्तीसाठी सज्ज; ‘जागतिक क्षयरोगा दिना’निमित्त १०० दिवसांचे विशेष अभियान

Solapur Mirror by Solapur Mirror
March 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर जिल्हा क्षयरोगमुक्तीसाठी सज्ज; ‘जागतिक क्षयरोगा दिना’निमित्त १०० दिवसांचे विशेष अभियान
0
SHARES
117
VIEWS

सोलापूर: देशात क्षयरोगाचे वाढते गांभीर्य लक्षात घेता, भारत सरकारचे ‘क्षयमुक्त भारत’ ध्येय पूर्ण करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. यावर्षी “होय आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो..! नेतृत्व- सोलापूर जिल्हा समर्थित जनभागीदारी!” या घोषवाक्यासह जिल्ह्यात जनजागृती आणि तपासणी मोहिमेला गती देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली आहे.

सिबिनॅट (जीन एक्सपर्ट) तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन
क्षयरोगाचे वेळीच निदान होण्यासाठी जिल्ह्यात आधुनिक ‘सिबिनॅट’ यंत्रणा कार्यान्वित आहे. हे मशीन जिल्हा क्षयरोग केंद्र सोलापूर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आणि बार्शी येथे उपलब्ध आहे. अति गंभीर स्वरूपाच्या संशयित रुग्णांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील वर्ष २०२५ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याने महाराष्ट्रात ५ वा क्रमांक पटकावला होता. “यावर्षी आपला जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असा विश्वास डॉ. नवले यांनी व्यक्त केला. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यातील २९० अति जोखमीच्या गावांमध्ये १०० दिवसांचे विशेष अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये संशयितांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच, जिल्ह्यातील १०२७ ग्रामपंचायतींपैकी ४४६ ग्रामपंचायती क्षयमुक्त होण्यास पात्र ठरल्या असून, त्यात १७ सुवर्ण, ११४ रजत आणि ३१५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, जेणेकरून सोलापूर जिल्हा पूर्णपणे क्षयमुक्त करता येईल, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

पोलिस बॅन्डस्मन पदाच्या लेखी परीक्षेला सुरुवात

Next Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली जिल्हा कोषागार कार्यालयाची पाहणी.

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली जिल्हा कोषागार कार्यालयाची पाहणी.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली जिल्हा कोषागार कार्यालयाची पाहणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025