Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

Solapur Mirror by Solapur Mirror
June 3, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

पुणे विमानतळावर स्लॉट मिळूनही उड्डाणाला विलंब; पावसाळ्यानंतरच निर्णयाची शक्यता

सोलापूर : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी थेट विमानसेवेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सोलापूरकरांची प्रतीक्षा आणखी लांबणार असल्याचे चित्र आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा असलेली पुणे–सोलापूर–तिरुपती विमानसेवा अद्यापही कागदावरच असून विमान कंपन्यांच्या नियोजनातील विलंबामुळे या मार्गावरील उड्डाणाला ब्रेक लागला आहे.

स्टार एअर कंपनीला पुणे विमानतळावर व्यावसायिक उड्डाणांसाठी आवश्यक स्लॉट मिळाल्यानंतर पुणे, सोलापूर आणि तिरुपती या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे सोलापूरकरांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, उड्डाणांचे वेळापत्रक, बुकिंग व्यवस्था आणि मनुष्यबळ नियोजन अद्याप अंतिम झाले नसल्याने सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. दरम्यान, फ्लाय ९१ एअरलाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी तिरुपती विमानसेवेबाबत पावसाळ्यानंतरच सकारात्मक विचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढीपूर्वी तिरुपतीसाठी थेट विमानसेवा सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

प्रवाशांचा वाढता प्रतिसाद; कंपन्यांची सावध भूमिका
सोलापूरच्या होटगी रस्ता विमानतळावरून सध्या सुरू असलेल्या मुंबई, हैदराबाद आणि गोवा विमानसेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. व्यावसायिक, उद्योजक, पर्यटक आणि सर्वसामान्य प्रवाशांकडून या सेवांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने विमान कंपन्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी सोलापूर आणि परिसरातून दरवर्षी हजारो भाविक प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर विमानसेवा सुरू झाल्यास प्रवाशांची संख्या लक्षणीय राहील आणि विमान कंपन्यांना चांगला महसूल मिळू शकतो, असा विश्वास विमान वाहतूक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

भाविकांची उत्सुकता कायम
गोवा, मुंबई आणि हैदराबाद विमानसेवेच्या यशानंतर आता तिरुपती विमानसेवेकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्ग सुरू करण्याबाबत कंपन्या सावध भूमिका घेत असल्याने भाविकांना थेट विमानप्रवासासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Previous Post

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

Next Post

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In