Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर मनात कायम; नागरिकांच्या प्रेमाचे ऋण विसरणार नाही! माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Solapur Mirror by Solapur Mirror
June 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर मनात कायम; नागरिकांच्या प्रेमाचे ऋण विसरणार नाही! माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

निरोप समारंभात माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद भावुक; प्रशासनाच्या सहकार्यामुळे विकासकामे मार्गी लागल्याची भावना

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निरोप समारंभात सोलापूरशी असलेले आपले भावनिक नाते व्यक्त करताना, “माझी बदली नागपूरला झाली असली तरी सोलापूर कायम माझ्या मनात राहील,” असे सांगितले. जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्णत्वास नेता आली, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी पदावरील यशस्वी कारकीर्द ही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सामूहिक कामगिरीवर अवलंबून असते. प्रशासनात शिस्त आणि कठोरता आवश्यक असून त्यामुळे कामांना गती मिळते व जनतेला त्याचा थेट लाभ होतो. त्यांनी आपल्या कार्यकाळातील पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूर विमानसेवा, आषाढी वारीचे यशस्वी नियोजन, पूरपरिस्थितीतील प्रशासनाचे कार्य तसेच जनता दरबारातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यांचा विशेष उल्लेख केला. “सामान्य नागरिकांसाठी काहीतरी चांगले करता आले, याचे समाधान आहे,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कुमार आशीर्वाद यांनी उभारलेली प्रशासनाची कार्यक्षम चौकट पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे आणि नेतृत्वगुणांचे कौतुक केले.

“सोलापूरने दिलेले प्रेम आणि सहकार्य आयुष्यभर विसरणार नाही. बदली झाली असली तरी सोलापूरच्या कोणत्याही कामासाठी मी सदैव तत्पर असेन.”
— कुमार आशीर्वाद, माजी जिल्हाधिकारी

Previous Post

बुधवारी पाणीपुरवठ्याला ब्रेक; शहरात पुन्हा शटडाऊन

Next Post

वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार; महापौरांकडे कारवाईची मागणी

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार; महापौरांकडे कारवाईची मागणी

वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात कर्मचाऱ्यांची तक्रार; महापौरांकडे कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In