Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनस्तरावर विशेष सहकार्य : जिल्हाधिकारी आशीर्वाद

Solapur Mirror by Solapur Mirror
February 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनस्तरावर विशेष सहकार्य : जिल्हाधिकारी आशीर्वाद
0
SHARES
11
VIEWS

पीएम उषा अंतर्गत कला व ललित कला आणि जीव विज्ञान संकुल इमारतींचे भूमिपूजन

सोलापूर, – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे सोलापूर जिल्ह्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे ज्ञानकेंद्र असून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच विविध विकासात्मक प्रस्तावांसाठी शासन स्तरावरून विशेष सहकार्य केले जाईल, अशी ठाम ग्वाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

शनिवारी, विद्यापीठ परिसरात पीएम उषा (PM-USHA) विभागाच्या मंजूर निधीतून उभारण्यात येणाऱ्या कला व ललित कला संकुल आणि जीव विज्ञान संकुल या दोन अत्याधुनिक इमारतींचे भूमिपूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अधिसभा सदस्य ॲड. मल्लिनाथ शहाबादे, डॉ. वीरभद्र दंडे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे, अभियंता गिरीश कुलकर्णी, प्रल्हाद कांबळे, डॉ. गौतम कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पीएम उषा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यापीठाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आणि विकासात्मक प्रस्तावांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. विशेषतः पंढरपूर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्राबाबत सखोल चर्चा झाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबतही सकारात्मक भूमिका घेतली जाईल. या दोन्ही प्रमुख विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतः चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठाला नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले की, पीएम उषा अंतर्गत मंजूर निधीमुळे विद्यापीठात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कला, ललित कला आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांत संशोधन व कौशल्याधारित शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे. विद्यापीठात विविध विकासकामे प्रगतीपथावर असून त्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभत आहे. यापुढेही त्यांनी विद्यापीठाच्या विकासाकडे विशेष लक्ष देऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 200 आरोग्य तपासणी

Next Post

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In