Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम

Solapur Mirror by Solapur Mirror
February 23, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम
0
SHARES
7
VIEWS

धर्मवीर बलिदान मासानिमित्त मुंडण

सोलापूर : सोलापूर शहरात रविवारी सकाळी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागात संपूर्ण फाल्गुन महिना धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. यानिमित्त रविवारी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या २११ धारकऱ्यांनी गणपती घाटावर सामूहिक मुंडण करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन केले सोलापूर शहरातील ११७, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ तर उत्तर सोलापूर तालुक्यातील ४२ जणांनी सामूहिक मुंडण केले. तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील धारकऱ्यांनी धर्मवीर बलिदान मासानिमित्त मोठ्या संख्येने मुंडण केले.

क्रूरकर्मा मुघल शासक औरंगजेब याने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडल्यानंतर महिनाभर त्यांचा प्रचंड छळ करून अत्यंत क्रूर हत्या केली. देव – देश आणि धर्मासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी बलिदान दिले. त्यांची आठवण म्हणून हिंदू बांधवांकडून संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा संपूर्ण महिना धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.

या संपूर्ण महिन्यात चौकाचौकामध्ये दररोज महिनाभर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात येते. तसेच हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींच्या निधनाचे सुतक संपूर्ण हिंदू समाजाला लागू असल्याच्या श्रद्धेतून महिनाभर चप्पल न घालणे, गोड न खाणे, मुंडण करणे, मांसाहार वर्ज्य करणे, गादी न वापरणे, आनंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे, आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे असे व्रत पाळले जाते.

सोलापुर शहरातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर बलिदान मास पाळला जात असून ७८ ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना दररोज श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी (यंदा १८ मार्च) मुकपदयात्रेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करून धर्मवीर बलिदान मासाची सांगता होणार आहे.

रविवारी सकाळी सामूहिक मुंडण करण्यासाठी गणपती घाटावर तरुणांची मोठी गर्दी झाली होती. प्रारंभी घाटावर हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर तरुणांनी सामूहिक मुंडण केले. याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनस्तरावर विशेष सहकार्य : जिल्हाधिकारी आशीर्वाद

Next Post

पुण्यातून अल्पवयीन मुलीची सुटका; अनैतिक मानवी वाहतूक शाखेची विशेष कारवाई..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
पुण्यातून अल्पवयीन मुलीची  सुटका; अनैतिक मानवी वाहतूक शाखेची विशेष कारवाई..

पुण्यातून अल्पवयीन मुलीची सुटका; अनैतिक मानवी वाहतूक शाखेची विशेष कारवाई..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In