Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वादळी वाऱ्याचा करमाळ्याला तडाखा; भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Solapur Mirror by Solapur Mirror
June 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वादळी वाऱ्याचा करमाळ्याला तडाखा; भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

करमाळा, : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागाला रविवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला. केतूर (क्र. १) परिसरात भिंत अंगावर कोसळून एका वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून वादळी वाऱ्यामुळे शेतकरी वर्गालाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. जगन्नाथ मारुती नवले (वय ८०) आणि शालन जगन्नाथ नवले (वय ७५) हे दाम्पत्य उजनी जलाशयालगतच्या आपल्या वस्तीवर राहत होते. रविवारी रात्री सुमारे नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ते जेवणासाठी बसले असताना अचानक जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याच्या तीव्र झोतामुळे घराशेजारील सिमेंट विटांची भिंत कोसळून दोघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळ आजूबाजूच्या वस्तीपासून दूर असल्याने रात्री उशिरापर्यंत कोणालाही या दुर्घटनेची माहिती मिळाली नाही. दरम्यान, करमाळ्यात राहणाऱ्या त्यांच्या नातवाने फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला. सोमवारी सकाळी तो वस्तीवर पोहोचला असता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेमुळे केतूर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नवले दाम्पत्याच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्याचा फटका संपूर्ण उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. पोमलवाडी, हिंगणी, गुलमोहरवाडी, केतूर आणि वाशिंबे परिसरात जोरदार वाऱ्यामुळे शेकडो एकरांवरील केळीची पिके जमीनदोस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी आंब्यांची झाडे फळांसह उन्मळून पडली असून फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे काही घरांचेही नुकसान झाले असून महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून होत आहे.

Previous Post

राजेंद्र राऊतांना उमेदवारी मात्र परिचारक नाराज, जयकुमार गोरे म्हणाले…

Next Post

उमेदवारी नाकारल्याने मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू नाराज, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

Related Posts

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Next Post
उमेदवारी नाकारल्याने मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू नाराज, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

उमेदवारी नाकारल्याने मंत्री जयकुमार गोरेंचे बंधू नाराज, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In