Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Solapur Mirror by Solapur Mirror
June 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

सोलापूर, ; आज राज्यभरातील सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ही सर्व शासकीय व खाजगी शाळा आज मोठ्या उत्साहात व आनंदात सुरू झाल्यात. सोलापूर शहराजवळील मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या त्यांनी विद्यार्थ्यांना तीन गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला – आई-वडील, शिक्षक आणि शाळेतील मित्र. तसेच मी जे काही आहे त्याचे श्रेय माझ्या शिक्षकांना जाते, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा सोलापूर शहरालगत आहे. शहरामध्ये खाजगी शाळांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. तरीही या शाळेतील शिक्षक वृंद यांनी येथील पटसंख्या कमी न होऊ देता त्यात वाढच केलेली आहे. मागील वर्षी 150 पटसंख्या असलेली ही शाळा यावर्षी 194 पटसंख्येपर्यंत घेऊन जाण्यात शाळेतील शिक्षकांनी मौलिक भूमिका बजावलेली आहे, त्यामुळे त्यांचे खूप कौतुक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगून असेच काम पुढेही करून विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, मुख्याध्यापक प्रकाश राचेटी, माजी मुख्याध्यापक शिवानंद भिमन्नवरु, केंद्र प्रमुख सिद्राम वाघमोडे, विस्तार अधिकारी बापूराव जमादार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैरप्पा कुरे, नगरसेविका वैशाली भोपळे, तसेच शिक्षक अप्पासाहेब ऊंबरानी, अमसिद्ध तीर्थकर व इतर शिक्षक उपस्थित होते.

प्रारंभी मजरेवाडी येथील शाळेच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर फित कापून शाळेच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी वेदश्री विष्णू माने हिने एटीएस परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिक्षक अप्पासाहेब ऊंबरानी यांनी प्रस्तावित केले. व आजचा शाळा प्रवेश उत्सव विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी खूप महत्त्वाचा असल्याचे सांगितले. शाळेसमोरील वाहतुकीच्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचीही त्यांनी मागणी केली.

Previous Post

नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

Next Post

सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सव-२०२६ला उत्साहात प्रारंभ

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सव-२०२६ला उत्साहात प्रारंभ

सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सव-२०२६ला उत्साहात प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In