Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षकेतर भरतीचा ‘ब्रेक’ अखेर हटला! महामंडळाच्या पाठपुराव्याला यश

Solapur Mirror by Solapur Mirror
August 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षकेतर भरतीचा ‘ब्रेक’ अखेर हटला! महामंडळाच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरील प्रदीर्घ काळापासूनची अनिश्चितता अखेर दूर झाली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींना मान्यता देण्याबाबत कार्यवाही करण्याचा शासन आदेश ११ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आला. त्यामुळे राज्यातील शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर अनेक वर्षांपासून निर्बंध होते. या प्रश्नावर विविध संस्था तसेच कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. शासनाने दोन वर्षांपूर्वी भरतीवरील बंदी उठविली होती. मात्र, २८ मे २०२५ रोजीच्या पत्रानुसार पुढील आदेशापर्यंत नियुक्तींना मान्यता तसेच शालार्थ मान्यता देऊ नये, असे निर्देश शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले होते.

या निर्णयामुळे रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने हा प्रश्न सातत्याने शासन दरबारी लावून धरला. महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष सचिन नलवडे, सुनील पंडित यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन शिक्षकेतर भरतीवरील निर्बंध दूर करण्याची मागणी केली.

शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण सचिव रणजीतसिंह देवल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आणि शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देत पाठपुरावा करण्यात आला. अखेर शासनाने नियुक्तींना मान्यता देण्याबाबत कार्यवाही करण्याचा आदेश काढल्याने महामंडळाच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळासह राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने स्वागत केले असून, रखडलेल्या नियुक्ती प्रक्रियेला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: dada bhuseआमदार ज्ञानेश्वर म्हात्रेमहामंडळाचे अध्यक्ष तानाजी मानेमाध्यमिकशिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंहशिक्षण मंत्री दादाजी भुसेशिक्षण संचालक महेश पालकरशिक्षण सचिव रणजीतसिंह देवलसचिन जगताप
Previous Post

कारंब्यात उजनीचे पाणी दाखल; शेतकऱ्यांना दिलासा!

Next Post

पत्रकारिता ,न्याय, समाजसेवेचा गौरव सोहळा; ‘मास लॉ’तर्फे ‘विधिमित्र’ पुरस्कार

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
पत्रकारिता ,न्याय, समाजसेवेचा गौरव सोहळा; ‘मास लॉ’तर्फे ‘विधिमित्र’ पुरस्कार

पत्रकारिता ,न्याय, समाजसेवेचा गौरव सोहळा; ‘मास लॉ’तर्फे ‘विधिमित्र’ पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In