Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘पसायदान’चे महत्त्व सातासमुद्रापार नेणार; आमदार सुभाष देशमुख यांचे कार्यक्रमात प्रतिपादन

Solapur Mirror by Solapur Mirror
March 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘पसायदान’चे महत्त्व सातासमुद्रापार नेणार; आमदार सुभाष देशमुख यांचे कार्यक्रमात प्रतिपादन
0
SHARES
28
VIEWS

सोलापूर :- जगातील सर्वात कमी वयाचा अध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते. त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आत्मशांती मिळविण्यासाठी माऊलींचे विचार आवश्यक आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने आयोजित ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ चे उद्घाटन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. हा कार्यक्रम सरस्वती विद्यामंदिर, सोलापूर येथे पार पडला.

कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, मोहन डोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, शाळेचे संचालक प्रशांत बडवे, देवसर तसेच इतर मान्यवर व भजनी मंडळे उपस्थित होती.

सर्वांचा आत्मा एकच असून मानवता हा एकच धर्म आहे. हे सर्व जगाला पटवून देण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरीचे लिखाण केले आणि तेही अतिशय सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत त्याचे भाषांतर केले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत हे माऊलींचे विचार  जगभरातील सर्व देशात पटवून देण्याचे कार्य केले जाईल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

 आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करताना सांगितले की, “मोगरा फुलला या अभंगांमध्ये मानवी मनाला नवसंजीवनी देण्याची ताकद आहे. हा कार्यक्रम भारताबाहेर इतर देशात सादर करून ‘पसायदान’चे महत्व तेथील लोकांना पटवून दिले जाईल. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. यामध्ये बार्शी, उत्तर सोलापूर व धाराशिव येथील भजनी मंडळांचा समावेश होता. अनुदानाचे धनादेश मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.  

या कार्यक्रमाचे सादरीकरण गायक गणेश शिंदे व संमती शिंदे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Previous Post

माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे हस्ते आधार संच वितरण

Next Post

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025