Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जुळे सोलापूरच्या शासकीय मैदानावर भव्य स्क्रीनवर सामने; प्रवेश मोफत, विविध मनोरंजन उपक्रमांची रेलचेल

Solapur Mirror by Solapur Mirror
April 30, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
जुळे सोलापूरच्या शासकीय मैदानावर भव्य स्क्रीनवर सामने; प्रवेश मोफत, विविध मनोरंजन उपक्रमांची रेलचेल
0
SHARES
1
VIEWS

शहरात शासकीय मैदानावर दोन दिवस मोफत जल्लोष

सोलापूर : देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी यंदाचा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) हंगाम अधिक मोठा, भन्नाट आणि आकर्षक ठरणार आहे. चाहत्यांच्या उत्साहाला नवा आयाम देण्यासाठी आयपीएल फॅन पार्कची भव्य संकल्पना यंदा 50 शहरांमध्ये राबवण्यात येत असून, लाखो चाहते या सोहळ्यात सहभागी होण्यास सज्ज आहेत. सोलापुरात दि. 2 व 3 मे रोजी हा थरार जुळे सोलापुरातील शासकीय मैदानावर आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बोर्सु यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   सोलापुरात जुळे सोलापूर येथील शासकीय मैदानावर याचे नेटके नियोजन करण्यात येत आहे. 32 बाय 18 फुटाचा मोठा स्क्रीन लावण्यात येत आहे. मागील वर्षी सोलापुरात या ठिकाणी 17 हजार प्रेक्षक उपस्थित होते. यंदा 25 हजार प्रेक्षक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. शनिवार दि. 2 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता चेन्नई सुपर किंग विरुद्ध मुंबई इंडियन्स ही मॅच पाहता येणार आहे. रविवार दिनांक 3 मे रोजी दुपारी अडीच वाजल्यापासून दोन मॅचेस होणार आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स या मॅचेस पाहता येणार आहेत. यावेळी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रसिद्ध खेळाडूंनी सही केलेले टी-शर्ट देण्यात येणार आहे.

    फॅन पार्क्समध्ये प्रचंड मोठ्या स्क्रीन्सवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण होणार असून, मैदानात बसल्याचा अनुभवच चाहत्यांना मिळणार आहे. शिट्ट्या, चीअरिंग, फेस पेंटिंग, शाऊट-आऊट्स आणि क्रेझी स्टंट्समुळे प्रत्येक ठिकाणी स्टेडियमसारखे वातावरण रंगणार आहे. विशेष म्हणजे, या फॅन पार्क्समध्ये प्रवेश पूर्णपणे मोफत असणार आहे. अधिकृत प्रायोजकांच्या माध्यमातून संगीत, खाद्यपदार्थ, शीतपेये आणि विविध मनोरंजन उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. त्यामुळे क्रिकेटसोबतच फॅमिली एंटरटेनमेंटचाही आनंद घेता येणार आहे. यंदाच्या हंगामात विविध ठिकाणी 10 लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी फॅन पार्क्सला भेट देतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघ आणि खेळाडूंबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याची संधीही येथे मिळणार आहे.

    सीमारेषेवरील षटकार, हॅट्रिक्स आणि रोमांचक क्षणांचा थरार अनुभवण्यासाठी आता चाहत्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. IPL 2026 च्या जल्लोषासाठी उलटगणती सुरू झाली असून, यंदा ‘क्रिकेट फॅनडम’चा उत्सव अधिक रंगतदार ठरणार आहे.
 या पत्रकार परिषदेस प्रकाश भुतडा, आनंद दातार, संजय वडजे, ऋत्विज चव्हाण, संतोष बडवे आदी उपस्थित होते.
Previous Post

बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा; विक्रम खेलबुडे, डॉ. मेतन, प्रा. विभुते, डॉ. हिप्परगी मानकरी

Next Post

शहर पोलीस दलातील दीपक जाधव यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
शहर पोलीस दलातील दीपक जाधव यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

शहर पोलीस दलातील दीपक जाधव यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In