सोलापूर : 2024 ची लोकसभा निवडणूक लागलेली त्याचवेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या देवेंद्र ची जबाबदारी स्वतः घेतली. त्या वेळचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ देवेंद्र कोठे यांनी वल्याळ क्रीडांगणावर केलेले भाषण चर्चेचे ठरले. त्यांच्यावर टीका झाली पण कुणाला ठाऊक हाच देवेंद्र सर्वाधिक मुस्लिम मतदार असलेल्या शहर मध्य या मतदारसंघातून भविष्याचा आमदार होईल.
राम सातपुते पराभूत झाले परंतु त्यांनी शहर मध्य विधानसभेसाठी यावे असे अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले पण शहर मध्य ची जबाबदारी घेतलेल्या देवेंद्र कोठे यांनी प्रणिती शिंदे यांच्या बालेकिल्ल्यांचा सुरुंग लावला. काँग्रेसला तिथे केवळ 900 मताधिक्यावर थांबवले. आणि याचेच गिफ्ट 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांना मिळाले. भारतीय जनता पार्टीने देवेंद्र कोठे यांना शहर मध्यमधून उमेदवारी दिली त्या मतदारसंघात तब्बल पन्नास हजाराचे मताधिक्य घेत देवेंद्र कोठे विजयी झाले.
निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना देवेंद्र कोठे कायम गंभीर असतात. त्यांच्या प्रयत्नातून सोलापूर शहराचा अतिशय आणि महत्त्वाचा बी 2 विषय मार्गी लागला आहे. देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल. सोलापूरचे विमान सेवा कधी सुरू होणार नाही असे विरोधक सांगायचे परंतु पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रयत्न करत सोलापूरची विमानसेवा सुरू केली. सोलापुरातून सध्या मुंबई आणि गोवा या ठिकाणी विमान उड्डाण घेते.
सोलापूरचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे मुंबईकडे स्थलांतरित होत असल्याने त्यांना इथेच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने आयटी पार्क साठी सातत्याने देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याची घोषणा सोलापुरात केली. सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न कायमच गंभीर राहिलेला आहे. आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. त्यासाठी आमदार देवेंद्र यांनी दररोज पाणीपुरवठा व्हावा प्रचंड पाठपुरावा केला. आपल्या एका भाषणात तर सिद्धरामेश्वरांची शपथ घेत सोलापूरकरांना दररोज पाणी देऊ शकलो नाही तर अशा आमदारकीचा राजीनामा देईन अशी भाषा केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन समांतर जलवाहिनीसाठी 1400 कोटीचा निधी आणण्यात ते यशस्वी झाले.
सोलापुरातील एमआयडीसी मधील अंतर्गत सुविधांसाठी तब्बल 55 कोटींचा निधी आणला. शहरातील दोन उड्डाणपुलाच्या विषयी ते कायम पाठपुरावा करीत असतात. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज सोलापुरात सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात महापालिकेत ऐतिहासिक विजय निवडण्यात देवेंद्र कोठे यांचाही मोलाचा वाटा होता.
एखाद्या विषयाचा मंत्रालय स्तरावर ते कायम पाठपुरावा करताना दिसतात. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघात नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क असतो. यासोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सन्मान देऊन त्यांच्या सुखा दुखात सहभागी होताना पाहायला मिळतात.