Saturday, October 24, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Solapur Mirror by Solapur Mirror
September 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
0
SHARES
4
VIEWS

सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व बचावकार्यातील उल्लेखनीय कार्याची दखल; सहा पुरस्कारांनी सोलापूरचा सन्मान

सोलापूर, : सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी, व्यक्ती व संस्थांचा मुंबई येथे आयोजित सहाव्या ‘सेफ-टेक पुरस्कार, परिषद व प्रदर्शन २०२६’मध्ये गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात सोलापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उत्कृष्ट कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत जिल्ह्याला एकूण सहा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. किंग्ज एक्सप्लो मीडिया यांच्या वतीने ३ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतील हॉटेल ताज येथे ‘सहावा सेफ-टेक पुरस्कार, परिषद व प्रदर्शन २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन आणि बचावकार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३५ अधिकारी, व्यक्ती व संस्थांचा या वेळी गौरव करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांना ‘बेस्ट ऑफिसर’ या विभागात ‘बेस्ट फायर फायटर अँड रेस्क्युअर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपत्तीच्या काळात तत्परतेने कार्यवाही करणे, बचावकार्याचे प्रभावी नियोजन आणि विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सोलापूर जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलातील (डीआरएफ) बजरंग होटकर, रामचंद्र वाघमारे, सागर धप्पाधुळे, शुभांगी गवते आणि अरुणा राठोड यांना पूरपरिस्थितीतील बचावकार्य, आग प्रतिबंधक उपाययोजना, आपत्कालीन बचावकार्य तसेच गर्दी नियंत्रणामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘फर्स्ट रिस्पॉन्डर अँड रेस्क्युअर’ या विभागात ‘बेस्ट फायर फायटर अँड रेस्क्युअर ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी आणि डीआरएफच्या जवानांनी तत्परता, धैर्य, शिस्त आणि सेवाभावाने काम केले आहे. पूर, आग, गर्दी नियंत्रण तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत करण्यात आलेल्या कार्याची या पुरस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
सोलापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळालेल्या या सन्मानाबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले तसेच डीआरएफच्या सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहून केलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांनी अधिकारी व जवानांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सहा पुरस्कारांमुळे सोलापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेसह अधिकारी आणि बचाव पथकाच्या सेवाभावी कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, हा सन्मान जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.

Previous Post

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

Next Post

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In