Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

Solapur Mirror by Solapur Mirror
September 7, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

सोलापूर | महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मधील सेटलमेंट फ्री कॉलनी, चव्हाण वस्ती परिसरातील श्रीकृष्ण अध्यात्मिक मठात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी आयोजित करण्यात आलेला भक्तिमय गुलाल सोहळा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.सोहळ्याच्या प्रारंभी संपूर्ण सेटलमेंट परिसरातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.

‘गोविंदा’च्या जयघोषात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगरप्रदक्षिणेमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या सोहळ्यास १०३ वर्षीय ह.भ.प. शिवलाल स्वामी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित भाविकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व सांगितले. भगवान श्रीकृष्णांनी दिलेला प्रेम, भक्ती, कर्म, सत्य आणि धर्माचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले. श्रद्धेसोबत सदाचाराची जोड असल्यास जीवनाला सकारात्मक दिशा मिळते, असा संदेशही त्यांनी दिला.दरम्यान, पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी श्रीकृष्ण भगवानांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. तसेच ह.भ.प. शिवलाल स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेत उपस्थित भाविकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या.जन्माष्टमीनिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करण्यात आले.यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, प्रभाग क्रमांक २२ चे भाजपा नगरसेवक किसन जाधव, नागेश मामा बाबुराव गायकवाड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, लहू गायकवाड, सुधीर बहिरवाडे, श्रीकांत श्रीराम जाधव, सचिन विलास जाधव यांच्यासह वारकरी संप्रदायातील भक्तगण, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Tags: आमदार देवेंद्र कोठेदेवेंद्र फडणवीसनगरसेवकराजकारणसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In