Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

Solapur Mirror by Solapur Mirror
September 7, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

सोलापूर : कर्जबाजारीपणामुळे पैशांची गरज निर्माण झाली अन् चोरी करण्याचा निर्णय घेतलेल्या एका तरुणाने युट्युबवर कुलूप उघडण्याची पद्धत पाहून जामगाव (ता. माढा) येथे घरफोडीचा डाव आखला. मात्र, चोरी करताना घरमालक जागा झाल्याने त्याने त्यांच्यावर हातोड्याने हल्ला करून त्यांची हत्या केली आणि घरातील सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. या खळबळजनक खून व घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत आरोपीला कलबुर्गी, कर्नाटक येथून जेरबंद केले. अजयकुमार गौतम चव्हाण (वय ३१, रा. जामगाव, हल्ली रा. लऊळ, ता. माढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

झोपेतून जागे झाले अन्…
२५ ऑगस्टच्या रात्री ९ ते २६ ऑगस्टच्या सकाळी साडेअकराच्या दरम्यान जामगाव येथे ही घटना घडली. विजयकुमार अशोक मुळे यांच्या घरात चोरट्याने मागील बाजूने प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून दागिने लंपास करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अशोक भीमान्ना मुळे (वय ६१) जागे झाले. अशोक मुळे यांनी चोरट्याला ओळखल्याने आरोपीने जवळील हातोड्याने त्यांच्या डोक्यात जबर प्रहार केला. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने सोन्याचे दागिने घेऊन तेथून पोबारा केला.

युट्युब व्हिडिओ ठरला चोरीचा ‘गुरू’
पोलिसांच्या तपासात आरोपीने धक्कादायक माहिती दिल्याचे समोर आले. घराच्या पाठीमागील पाईपच्या साहाय्याने तो घरात शिरला. वरच्या खोलीचे लोखंडी कुलूप उघडण्यासाठी त्याने युट्युबवर पाहिलेल्या पद्धतीचा वापर केला. सिरिंजच्या माध्यमातून कुलपात पेट्रोल टाकून ते पेटवून कुलूप उघडल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले. यानंतर कपाट उचकटत असताना अशोक मुळे जागे झाले आणि चोरीचा डाव रक्तरंजित हत्येत बदलला.

सीसीटीव्हीने दिली दिशा; कलबुर्गीत सापळा
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी चार स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला. सपोनि विजय शिंदे यांच्या पथकाने तब्बल तीन दिवस जामगावात तळ ठोकून घटनास्थळाचा बारकाईने तपास केला. घटनास्थळी मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांसह गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीतून आरोपीचा सुगावा लागला. दरम्यान, पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याची चाहूल लागताच आरोपीने मोबाईल बंद करून पलायन केले. सीसीटीव्हीच्या आधारे तो कलबुर्गी परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कलबुर्गीकडे रवाना झाले.

वाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आरोपी असल्याची माहिती मिळताच वाडी रेल्वे पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला माढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या साहित्याबाबत तसेच चोरीच्या दागिन्यांबाबत अधिक तपास सुरू आहे. पुढील तपास माढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रोहित शिंदे करीत आहेत. या कारवाईमुळे खून आणि घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

Previous Post

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

Related Posts

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In