Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

Solapur Mirror by Solapur Mirror
September 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय; मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल आहे गुन्हा

सोलापूर : पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत दाखल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील प्रकाश अशोक सोनार (वय ३६, रा. मैंदर्गी, ता. अक्कलकोट) आणि नितीन शिवानंद पोतदार (वय २१, रा. मोहोळ) या दोघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे यांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी हा आदेश दिला. मोहोळ पोलिस ठाण्यात १४ एप्रिल २०२४ रोजी गु.र.क्र. २४७/२०२४ अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४(अ), ३५४(ब), ४५२, ३२३, ५०६ व ३४ तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

फिर्यादीच्या जबाबानुसार, १३ एप्रिल २०२४ रोजी रात्री सुमारे पावणेबाराच्या सुमारास खंडाळी (ता. मोहोळ) येथील घराच्या परिसरात संबंधित प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच फिर्यादीला धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला. घटनेनंतर फिर्यादीला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे नोंदविण्यात आलेल्या जबाबाच्या आधारे मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात सोनार आणि पोतदार यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अर्ज केला होता. आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना त्यांच्या अटकेची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तपासात सहकार्य करण्यास आणि न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करण्यास आरोपी तयार असल्याचेही सांगण्यात आले. आरोपींच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार करून अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची विनंती बचाव पक्षाने केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अश्विन डी. भोबे यांनी दोन्ही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करत त्यांना सशर्त अटकपूर्व जामीन दिला.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. कदीर औटी, ॲड. सौरभ तांदळे, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. अजय वाघमारे, ॲड. त्वरिता वाघ, ॲड. भाग्यश्री जगदाळे, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. सलामत पटेल, ॲड. संकेत पवार, ॲड. प्रदिप गायकवाड आणि ॲड. सागर स्वामी यांनी काम पाहिले

Previous Post

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

Next Post

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Related Posts

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Next Post
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In