सोलापूर ; दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर आयोजित आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्या सहयोगाने अभिजात संगीत कला प्रचारासाठी कोजागिरी पौणिमेच्या निमित्ताने, रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, हुतात्मा स्मृती मंदिर येथे..
गुरुवर्य पद्मश्री पं. जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पं. शौनक अभिषेकी आणि नातू अभेद अभिषेकी हे ‘वारसा चांदणसुरांचा’ ही सांगितिक मैफल सादर करत आहेत. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावसंगीत, अभंग या प्रकारच्या संगीतरचनांचे गायन या मैफलीत सादर होणार असल्याची माहिती दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दीपक कलढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संवादिनी-माधव लिमये, तबला-पं.सुभाष कामत, कार्तिक स्वामी, मृदंग- ज्ञानेश्वर दुधाणे आणि टाळ – दिलीप पोतदार हे नामवंत कलाकार साथसंगत करणार आहेत. उद्योजक राहूल बुऱ्हाणपुरे आणि वैभव सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती आहे. ही मैफल सर्व रसिकांसाठी खुली असून या मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन दुर्वाकुर तर्फे गायक कलढोणे, वर्धराज मिर्जी यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस उद्योजक राहूल बुऱ्हाणपुरे, वैभव सुरवसे, डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते.