Thursday, November 5, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ऊस गाळप जोरात, शेतकऱ्यांचा दर अंधारात; राजू शेट्टी संतापले!

Solapur Mirror by Solapur Mirror
November 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ऊस गाळप जोरात, शेतकऱ्यांचा दर अंधारात; राजू शेट्टी संतापले!
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर ; सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लाखो टन उसाचे गाळप करूनही अद्याप उसाचा पहिला हप्ता आणि दर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्याऐवजी दराचा निर्णय प्रलंबित ठेवून गाळप सुरू ठेवणाऱ्या कारखानदारांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘उसाचा दर जाहीर करा, अन्यथा सोलापुरात येऊन शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू,’ असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधताना राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. या संवादाची माहिती सोशल मीडियावर समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या उसाचा दर निश्चित न करता लाखो टन उसाचे गाळप करणे म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यासारखे आहे. स्वतःच्या कष्टाने पिकविलेल्या उसाला किती दर मिळणार, हे जाणून घेण्याचा प्रत्येक शेतकऱ्याला अधिकार आहे. मात्र, कारखानदारांकडून या अधिकाराकडेच दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

साखर कारखानदारांना गाळपाची एवढीच घाई असेल, तर त्यांनी सर्वप्रथम उसाचा दर जाहीर करावा. जाहीर केलेला दर शेतकऱ्यांना मान्य असेल, तर ते स्वतःहून ऊस गाळपासाठी देतील. मात्र, दराचा निर्णय न घेता शेतकऱ्यांवर दबाव टाकून ऊस घेण्याचा प्रयत्न करणे ही सरळसरळ दादागिरी असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. इतर जिल्ह्यांतील साखर कारखानदार उसाला दर देण्याची तयारी दर्शवत असताना सोलापूर जिल्ह्यातील कारखानदार मात्र दर जाहीर करण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकीकडे शेतकरी उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि शेतीवरील वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत उसाच्या पहिल्या हप्त्याबाबत अनिश्चितता कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीपर्यंत कोणत्याही साखर कारखानदाराने शेतकऱ्यांवर दबाव आणू नये किंवा बळजबरी करू नये, अशी स्पष्ट भूमिका शेट्टी यांनी मांडली आहे. बैठकीत ऊसदराच्या प्रश्नावर समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. साखर उद्योगाच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणारी प्रवृत्ती सहन केली जाणार नाही. जिल्ह्यातील कारखानदारांनी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी. अन्यथा सोलापूर जिल्ह्यात ठाण मांडून महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र करत व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिल्याने जिल्ह्यातील साखर उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

‘दर ठरवा, मगच ऊस गाळप करा!’
शेतकऱ्यांच्या उसाला किती दर द्यायचा, हे निश्चित न करताच गाळप सुरू ठेवण्याच्या कारखानदारांच्या भूमिकेवर राजू शेट्टी यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. कारखानदारांनी प्रथम उसाचा दर जाहीर करावा आणि त्यानंतरच शेतकऱ्यांच्या संमतीने ऊस गाळपासाठी घ्यावा. शेतकऱ्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष
सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी होणारी बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पहिल्या हप्त्याची रक्कम, ऊसदराची घोषणा आणि कारखानदारांची भूमिका या मुद्द्यांवर बैठकीत काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याची शक्यता आहे.

Tags: ऊस गाळपऊसदरदेवेंद्र फडणवीसराजकारणराजू शेट्टीशेतकरी संघटनासोलापूरस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

कुंभार चेअरमन, सुतार संचालक; श्री स्वामी समर्थ पतसंस्थेला नवे नेतृत्व!

Next Post

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे तिजोरीतून 53 लाखाच्या आठ गाड्या खरेदी..

Related Posts

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!
सोलापूर जिल्हा

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

November 4, 2026
भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!
सोलापूर जिल्हा

भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

November 4, 2026
समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!
सोलापूर जिल्हा

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

November 4, 2026
जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सवा’चा शुभारंभ
सोलापूर जिल्हा

जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सवा’चा शुभारंभ

November 3, 2026
प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेची कोंडी; सोलापूरकरांना विशेष गाड्यांची प्रतीक्षा!
सोलापूर जिल्हा

प्रवाशांची गर्दी अन् रेल्वेची कोंडी; सोलापूरकरांना विशेष गाड्यांची प्रतीक्षा!

November 3, 2026
मी पुन्हा एकदा सांगतो प्रवाशांना विशेष सुविधा द्या ; मंत्री प्रताप सरनाईक
सोलापूर जिल्हा

मी पुन्हा एकदा सांगतो प्रवाशांना विशेष सुविधा द्या ; मंत्री प्रताप सरनाईक

November 3, 2026
Next Post
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे तिजोरीतून 53 लाखाच्या आठ गाड्या खरेदी..

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे तिजोरीतून 53 लाखाच्या आठ गाड्या खरेदी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

स्वामी सेवेकऱ्यांची दिवाळी गोड; देवस्थानकडून वेतनाएवढा बोनस!

November 4, 2026
भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

भाजपचे विराट शक्तिप्रदर्शन; सोलापूरची वाहतूक मात्र ठप्प!

November 4, 2026
समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

समर्थ बँकेच्या अध्यक्षपदी किरण करकमकर; उपाध्यक्षपदी प्रशांत बागेवाडीकर!

November 4, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In