सोलापूर – मौजे वडाळा, ता. उत्तर सोलापूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधीकरण यांचेकडून सेवा महाशिबीर दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजीत करण्यात आले होते. या शिबीरामध्ये जिल्ह्यातील असंख्य नागरिक हजर होते. या शिवारास प्रमुख उपस्थिती म्हणून न्यायमुर्ती निजामोददीन जमादार, उच्च न्यायालय, मुंबई, न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला, उच्च न्यायालय, मुंबई हे हजर होते. या कार्यक्रमासाठी सोलापूर येथील मनोज शर्मा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश सोलापूर, एम. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, उपस्थित होते.
या महाशिबारामध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागाकडून स्टॉल लावण्यात येवून त्यांच्या विभागाकडून सामान्य नागरिकांना देण्यात येणारे सेवांची माहिती पुरविण्यात येत होती. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 3 स्टॉल लावण्यात आले होते.

यामध्ये सायबर गुन्हे जनजागृतीत गुन्हेगारीचे प्रकार, बचावाचे उपाय तसेच ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याची जनजागृती करण्यात आली. डायल 112 या सेवा वापरण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती देण्यात आली. AI DRONE – पोलीस विभागाकडून पंढरपूर आषाढी वारी, कोम्बींग ऑपरेशन, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त, मोर्चे, मोठया सभा यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनची माहिती देवुन प्रात्यक्षीक दाखविली.
सदरची कामगिरी ही अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर उपविभाग, संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. सोलापूर, यांच्या मार्गदर्शना खाली पोनि राहूल देशपांडे, सोलापूर तालुका पो. ठाणे, सपोनि डोंगरे, सपोनि टिळेकर, पोउपनि अमितकुमार करपे, पोउपनि मणूरे, पोहेकॉ तांबोळी, सायबर पोलीस ठाणे, पोकों अजीत सुरवसे, पोकॉ अरब यांनी पार पाडली आहे.










