सोलापूर: सोलापूर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गणेश (मालक) कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त आज, बुधवार दि. ४ मार्च २०२६ रोजी हरिया चौकातील इंद्रधन आपारमेंट येथे भव्य ‘नागरी सत्कार समारंभाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी सोलापूरकरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.या कार्यक्रमाचे आयोजन विजय चिप्पा, विक्रांत कदम, लक्ष्मीकांत सरगम, आणि सचिन पवार यांसह त्यांच्या मित्रपरिवाराने केले आहे.

या कार्यक्रमाला राजकीय व उद्योजक, सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे.उद्योजक गणेश कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ सत्कार सोहळाच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिष्टचिंतन करण्यात येत आहे.
सोलापूरच्या सामाजिक वर्तुळात ‘मालक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश कोळी यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. मरीआई चौक परिसरात होणाऱ्या या मुख्य कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुखकर्ता रियालिटी या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.











