सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि तथागत गौतम बुद्ध जयंतीचे औचित्य साधून डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवार दि. 1 मे 2026 रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संस्थेच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी जपत हा विवाह सोहळा आयोजित केला आहे. विवाह सोहळ्याचे हे 21 वे वर्ष आहे. सोलापुरातील मुकुंद नगर येथील काडादी हायस्कूल येथे हा विवाह सोहळा होणार आहे. या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वधू वरास कपडे, मनी मंगळसूत्र , जोडवे, संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. दि. 1 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत यासाठी इच्छुका वधू-वरांनी आपली नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी नगरसेवक गौतम कसबे 97 30 32 03, उत्तम कसबे 88 88 48 43 75, धीरज माने 9890430942, शशिकांत शिरसट 98 50 800 841 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दशरथ कसबे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस किरण डोळसे, भालचंद्र साखरे, शशिकांत शिरसट, बापूसाहेब सदाफुले, संजीव माने, खंडू वाघमारे, संघरक्षित बनसोडे, संदीप भालेराव, बुद्धप्रकाश कसबे आदी उपस्थित होते.










