Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“भ्रष्ट अधिकाऱ्यांचे ‘वतन’ जमिनीवर डोळे? मोडनिंबमध्ये शेतकऱ्याची फसवणूक; आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात न्यायनिवाडा!”

Solapur Mirror by Solapur Mirror
April 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“भ्रष्ट अधिकाऱ्यांचे ‘वतन’ जमिनीवर डोळे? मोडनिंबमध्ये शेतकऱ्याची फसवणूक; आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात न्यायनिवाडा!”
0
SHARES
49
VIEWS

सोलापूर: महसूल प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ७-१२ उताऱ्यावरील नावे परस्पर वगळल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालुक्यातील मोडनिंब येथे समोर आला आहे. वर्षानुवर्षे आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढा देणाऱ्या गोरख जिजाबा शिंदे या शेतकऱ्याने आता न्याय मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेतला असून, ९ मार्च २०२६ पासून आपल्या संपूर्ण कुटुंबासह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास ही शेतकरी बसले आहे.

मोडनिंब येथील रहिवासी गोरख जिजाबा शिंदे यांची मौजे मोडनिंब येथे गट नं. १९७/४ (क्षेत्र २ हे ८१ आर) आणि गट नं. २७६/४ (क्षेत्र १ हे ४७ आर) अशी वडिलोपार्जित शेतजमीन आहे. ही जमीन ‘महार वतन’ प्रवर्गातील आहे. शिंदे यांचा असा आरोप आहे की, काही हितसंबंधी व्यक्तींनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून या दोन्ही सातबारा उताऱ्यांवरून गोरख शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे बेकायदेशीरपणे वगळली आहेत.

बेकायदेशीर माती उत्खनन आणि धमक्याकेवळ जमीन हडपण्याचा प्रयत्नच नव्हे, तर या जमिनीतून प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता विटभट्टीसाठी रातोरात माती उचलली जात आहे. याबाबत शिंदे यांनी उपविभागीय कार्यालय कुर्डूवाडी, तहसीलदार माढा, मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, या तक्रारींची दखल घेण्याऐवजी स्थानिक प्रशासन माती माफियांच्या पाठीशी उभे असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला आहे. “मी तक्रार का करतो?” म्हणून संबंधित व्यक्तींकडून आपल्याला आणि कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

प्रशासकीय अनास्था आणि उपोषणाचा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून अर्ज-विनंत्या करूनही न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या शिंदे कुटुंबाने आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या उपोषणादरम्यान शिंदे कुटुंबाच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे.”आमची कागदपत्रे तपासून पुन्हा आमची नावे ७-१२ उताऱ्यावर लावण्यात यावीत आणि बेकायदेशीर माती उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

आता या प्रकरणात जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात आणि पीडित शेतकऱ्याला न्याय मिळतो का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

एका बाजूला सरकार ‘शेतकरी हिताच्या’ गप्पा मारत असताना, दुसऱ्या बाजूला एका शेतकऱ्याला आपल्या हक्काच्या जमिनीसाठी सहकुटुंब उपोषणाला बसावे लागणे, हे प्रशासनाचे अपयश मानले जात आहे.

Previous Post

३१ मार्चला कोषागार कार्यालयाचा ‘ओव्हरटाईम’; जिल्हाधिकाऱ्यांनी थोपटली अधीक्षक वैभव राऊत यांची पाठ!”

Next Post

आमदार जयंत आसगावकर यांच्या दणक्याने शिक्षण विभागाची धावपळ; प्रलंबित देयके आणि ‘शालार्थ आयडी’चे प्रश्न जागेवरच सुटले!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
आमदार जयंत आसगावकर यांच्या दणक्याने शिक्षण विभागाची धावपळ; प्रलंबित देयके आणि ‘शालार्थ आयडी’चे प्रश्न जागेवरच सुटले!

आमदार जयंत आसगावकर यांच्या दणक्याने शिक्षण विभागाची धावपळ; प्रलंबित देयके आणि 'शालार्थ आयडी'चे प्रश्न जागेवरच सुटले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025