Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी बार्शीत

Solapur Mirror by Solapur Mirror
April 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी बार्शीत
0
SHARES
17
VIEWS

बार्शी : भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून बार्शी शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प असल्याचे सांगत श्री भगवंत प्रकटोत्सवानिमित्त २८ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बार्शीत येणार असल्याची माहिती महोत्सवाचे मार्गदर्शक तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.ग्रामदैवत श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त आयोजित भगवंत महोत्सव आता बार्शीकरांसाठी आकर्षण ठरला आहे.

येत्या काळात श्री भगवंत मंदिर व परिसराचा सर्वांगीण कायापालट करण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या आगमनामुळे तीर्थक्षेत्र विकासाला गती मिळेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्राच्या उभारणीसाठी राजसत्ता व देणगीदारांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नगरपालिका इमारत जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेत स्थलांतरित करून सध्याची इमारत मंदिर परिसराच्या विकासासाठी वापरण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या ‘ऑल दि बेस्ट’ या गाजलेल्या मराठी विनोदी नाटकाने बार्शीकरांना अक्षरशः खळखळून हसविले. हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार ठरला. दरम्यान हा महोत्सव सर्व बार्शीकरांचा असून या महोत्सवासाठी अनेकांनी सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात आयोजित केला जाईल, अशी ग्वाही राऊत यांनी दिली. दरम्यान, पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेला होम मिनिस्टर कार्यक्रम २८ एप्रिल रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, भाजप युवानेते ॲड. रणवीर राऊत, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, शिवशक्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बुरगुटे, डॉ. गुलाबराव पाटील, मंदार कुलकर्णी, नगरसेवक विजय राऊत, राजाभाऊ सुरवसे, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बारबोले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, संतोष निंबाळकर, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, डॉ. संजय अंधारे, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी आदी उपस्थित होते.

Previous Post

आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

Next Post

‘भोंदू’ खेळ खल्लास: मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेला 3 दिवसाची पोलीस कोठडी..

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
‘भोंदू’ खेळ खल्लास: मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेला 3 दिवसाची पोलीस कोठडी..

'भोंदू' खेळ खल्लास: मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेला 3 दिवसाची पोलीस कोठडी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025