सोलापूर : मोहळ येथील श्री नागनाथ महाराज महाराज यात्रेत कै. दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ अविनाश दत्तात्रय गोडसे व सतिश दत्तात्रय गोडसे यांच्या वतीने भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी मोहोळ पंचायत समिती गट नेते संजीव खिलारे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड मुख्याध्यापक संतोष गायकवाड नगरसेवक सुशिल क्षीरसागर आदी उपस्थित होते.
सध्या उन्हाळा सुरु आहे. याच काळात ग्रामीण भागात ग्रामदैवतोंच्या यात्रा सुरु आहेत. यात्रा काळात आलेल्या भाविकांना थंड पाणी मिळावे यासाठी गोडसे परिवार प्रतिवर्षी बाविकांना थंड पाण्याची सोय करते. त्याचाच भाग म्हणून याही वर्षी ही सोय करण्यात आली होती. कडक उन्हात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी थंड पाण्याचा आस्वाद घेतला. यावेळी सुनिल गायकवाड, कारभारी गायकवाड, अविनाश गोडसे, सतिश गोडसे, जगदीश गोडसे, आसावरी गोडसे, आदेश गोडसे, विभावरी गोडसे, माहेश्वरी गोडसे, जान्हवी गोडसे, श्लोक गोडसे, वैष्णवी चव्हाण, शिवदत्त चव्हाण, सुरेश राऊत, आयुब इनामदार, चंद्रकांत सुळ, सुरेश माळी, अफिज सादिक इनामदार, शकील इनामदार, रुतुराज गायकवाड, बाहुबली खांडेकर, दिगंबर व्हनमाने आदि उपस्थित होते.










