सोलापूर : लोकसेवेचा वसा घेऊन आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना आज सोलापूर येथे मानाच्या ‘जिल्हास्तरीय भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. दैनिक ‘दामाजी एक्सप्रेस’च्या वतीने आयोजित या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या शुभहस्ते हा गौरव करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना मंगेश चिवटे काहीसे भावूक झाले होते. ते म्हणाले, “जेव्हा आपल्याच मातीत आपल्या कामाची दखल घेतली जाते, तेव्हा ती पावती सर्वात मोठी असते. या पुरस्कारामुळे माझ्या खांद्यावरची जबाबदारी अधिक वाढली असून, इथून पुढे अधिक जोमाने आणि तडफेने सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी मी स्वतःला झोकून देईन.”या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी जमली होती. वक्त्यांनी आपल्या भाषणात चिवटे यांच्या कार्याचा उल्लेख ‘आरोग्यदूत’ असा केला.
“सामान्यांच्या हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता” अशी त्यांची प्रतिमा आज या पुरस्काराने अधिक गडद झाली आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी चिवटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.













