Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयस्पद मृत्यू -प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मंगळवेढ्यातील विवाहितेचा संशयस्पद मृत्यू -प्रकरणी अटकेतील आरोपीस जामीन मंजूर!
0
SHARES
46
VIEWS

सोलापूर : धनश्री जगताप मृत्यू प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गु.र. क्र. ०१४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ३५२ व ३(५) प्रमाणे संदीप गौतम जगताप (वय ३६, रा. सप्तशृंगी नगर, मंगळवेढा, सोलापूर) व अन्य २ असे एकूण ३ जणाविरुद्ध दिनांक ०७/०३/२०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादी आप्पासो मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी धनश्री हिचे लग्न दिनांक १६/११/२०२५ रोजी आरोपी संदीप जगताप याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून तिच्या मानसिक स्थितीबाबत आक्षेप घेण्यात आले व तिला माहेरी पाठविण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. पुढे आरोपी व त्याच्या कुटुंबीयांकडून मयत धनश्री हिच्यावर वारंवार तिच्या आजाराबाबत दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आले होते. दिनांक ०४/०३/२०२६ रोजी मयत धनश्री हिचा सासरी शेतात संशयास्पद मृत्यू झाल्याने सदर गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील आरोपी संदीप जगताप यास अटक करण्यात आले होती. आरोपीने मे. जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे जामिनासाठी आपला अर्ज दाखल केला होता.

यात आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की, ०७/०३/२०२६ रोजी दाखल झालेल्या FIR मध्ये सुरुवातीला केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून खुनाचा नाही. आजपर्यंत खुनाबाबत कोणताही ठोस प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध नाही. कॉल रेकॉर्डिंगमुळे केवळ उपस्थिती दिसून येते, मात्र त्यावरून गुन्हा सिद्ध होत नाही. तसेच मृत व्यक्ती मानसिक आजारावर उपचार घेत होती व न्युरोलॉजिस्टकडून उपचार सुरू होते. आरोपी ०७/०३/२०२६ पासून कोठडीत असून तपासासाठी पुरेसा कालावधी मिळाला आहे. साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता असल्यास ती योग्य अटी घालून टाळता येऊ शकते. त्यामुळे आरोपीस जामीन मंजूर करावा, अशी विनंती करण्यात आली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ओ. आर. देशमुख यांनी दिनांक १८/०४/२०२६ रोजी अटकेतील आरोपी संदीप गौतम जगताप यास सशर्त जामीन मंजूर केला. वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी , ॲड. वैभव बोंगे,ॲड. संकेत पवार,ॲड. साहिल शेख, ॲड. त्वरिता वाघ, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड‌. वांगीकर यांनी काम पाहिले.

Previous Post

संगमेश्वर रात्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांना पीएच.डी.

Next Post

न्यायाधीश पतीला आता न्यायाधीश पत्नीची साथ; सोलापूरचे प्रथमेश शिंदे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात दुसरे

Related Posts

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
Next Post
न्यायाधीश पतीला आता न्यायाधीश पत्नीची साथ; सोलापूरचे प्रथमेश शिंदे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात दुसरे

न्यायाधीश पतीला आता न्यायाधीश पत्नीची साथ; सोलापूरचे प्रथमेश शिंदे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात दुसरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025