सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूर येथे शिवरत्न सभागृहात स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती दीपक वैद्य होते.सभेस अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामपा चिवडशेट्टी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे उपस्थित होत्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, शांभवी कल्याणशेट्टी, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, दादासाहेब लवटे, सविता उंबरजे आणि रमेश भांजे उपस्थित होते.प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) व सदस्य सचिव स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सूर्यकांत भुजबळ तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.










