सोलापूर – येथील दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उल्लेखनीय लागला असून प्रशालेने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेचा एकूण निकाल 98.58% इतका लागला असून डिस्टिंक्शन मध्ये 42 विद्यार्थी, प्रथम श्रेणी 51 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 31 विद्यार्थी तर पास क्लासमध्ये 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी व त्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे-प्रथम- सुशांत वड्डेपल्ली 94.40%, द्वितीय- रिचा वड्डेपल्ली 92.80%, तृतीय- सारिका शिवगुंडे व गायत्री करदास 92 % यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील व पर्यवेक्षिका सुनीता गवळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानीय सचिव महेश चोप्रा, प्रशासकीय अधिकारी डॉ.विजयकुमार उबाळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.