Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बाजार समिती आवारात रिक्षांना प्रवेश द्या; रिक्षाचालकांची सभापती दिलीपराव माने यांच्याकडे मागणी

Solapur Mirror by Solapur Mirror
May 9, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
बाजार समिती आवारात रिक्षांना प्रवेश द्या; रिक्षाचालकांची सभापती दिलीपराव माने यांच्याकडे मागणी
0
SHARES
4
VIEWS

नियम व शिस्त पाळण्याची ग्वाही; संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णयाचा दिलासा

सोलापूर, : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रिक्षा व्यवसायाला परवानगी मिळावी, या मागणीसाठी रिक्षाचालकांनी आक्रमक पण संयमी भूमिका घेतली आहे. बाजार समितीचे सर्व नियम, निकष आणि शिस्त पाळण्यास आम्ही कटिबद्ध आहोत; मात्र आमचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असल्याने आम्हाला आवारात प्रवेश द्यावा, अशी मागणी रिक्षाचालकांनी बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांच्याकडे केली. सभापती दिलीपराव माने यांनी शुक्रवारी पहाटे पाच वाजता बाजार समितीच्या विविध विभागांची पाहणी केली. यावेळी गेट परिसरात रिक्षाचालकांनी त्यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. रिक्षाचालकांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना माने म्हणाले की, काही चालकांकडून होणारी अरेरावी तसेच वाहतुकीला होणारा अडथळा यामुळे प्रशासनाला यापूर्वी कठोर पावले उचलावी लागली होती. मात्र रिक्षाचालकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

या पाहणीदरम्यान सभापतींनी कांदा, भाजीपाला, फळ व फुल बाजाराचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून बाजारातील अडचणी जाणून घेतल्या. विशेषतः कोकणातून आंबा विक्रीसाठी आलेल्या उत्पादकांशी त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मालाचे वजन, व्यवहार किंवा देयक प्रक्रियेत कोणतीही फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. बाजार समिती प्रशासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे स्पष्ट निर्देशही सभापती माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बाजार समिती परिसरातील वाहतूक, शिस्त आणि शेतकरी हित या तिन्ही बाबींचा समतोल राखत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags: बाजार समितीरिक्षाचालकांसभापतीसभापती दिलीपराव मानेसिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती
Previous Post

निलमनगरात श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सवाला उत्साह; १५ मेपासून विविध धार्मिक कार्यक्रम `

Next Post

दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेचा दहावीचा निकाल ९८.५८ टक्के; सुशांत वड्डेपल्ली प्रथम

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेचा दहावीचा निकाल ९८.५८ टक्के; सुशांत वड्डेपल्ली प्रथम

दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेचा दहावीचा निकाल ९८.५८ टक्के; सुशांत वड्डेपल्ली प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In