Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हद्दवाढ भागातील १२ गावांचा मालमत्ता प्रश्न सुटणार; वर्षभरात मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’!

Solapur Mirror by Solapur Mirror
May 14, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
हद्दवाढ भागातील १२ गावांचा मालमत्ता प्रश्न सुटणार; वर्षभरात मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’!
0
SHARES
19
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका हद्दवाढ भागातील १२ गावांमधील नगर भूमापन, प्रॉपर्टी कार्ड व मालमत्ता नोंदणी प्रक्रियेबाबत आज महापौरांच्या कक्षात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्यासह नगर भूमापन विभागाचे कुरेशी, मॅपक्स कंपनीचे प्रमुख सचिन कांबळे व व नगररचना विभागाचे उप अभियंता जोशी व सहा.अभियंता श झरतार व मुद्रांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत हद्दवाढ भागातील १२ गावांमध्ये सुरू असलेल्या नगर भूमापन कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः प्रॉपर्टी कार्ड तयार करणे, एनओसी प्रक्रिया, सातबारा उतारा, खरेदी-विक्री नोंदी तसेच नागरिकांना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी नागरिकांना मालमत्तेचे अधिकृत दस्तऐवज वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनाने गतीने कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पुढील एक वर्षाच्या कालावधीत हद्दवाढ भागातील सर्व १२ गावांमधील प्रॉपर्टी कार्ड तयार करून नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.तसेच या संपूर्ण प्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती मिळावी यासाठी येत्या दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर महानगरपालिका कौन्सिल हॉल येथे सर्व नगरसेवकांसाठी विशेष सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सादरीकरणामध्ये प्रॉपर्टी कार्ड, नगर भूमापन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व पुढील कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे.महापालिका प्रशासनाच्या या उपक्रमामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांच्या मालमत्ता विषयक समस्या मार्गी लागण्यास मदत होणार असून मालमत्तेच्या कायदेशीर नोंदी अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर रस्ते पाहणी, देवदर्शन आणि महामार्गांचे भूमिपूजन

Next Post

जागतिक परिचारिका दिनी सोलापुरात नवजीवनाचा आनंद; परिचारिकांच्या सेवेतून सात बाळांचा जन्म..!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
जागतिक परिचारिका दिनी सोलापुरात नवजीवनाचा आनंद; परिचारिकांच्या सेवेतून सात बाळांचा जन्म..!

जागतिक परिचारिका दिनी सोलापुरात नवजीवनाचा आनंद; परिचारिकांच्या सेवेतून सात बाळांचा जन्म..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025