Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 20, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : सोलापूर शहर गुन्हे शाखेने रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत चार सराईत आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने न्यू बुधवार पेठ परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.

गेल्या ४ मे रोजी रात्री दहा ते ५ मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान न्यू बुधवार पेठ परिसरातील दोन बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातील रोख रक्कम आणि एका लहान मुलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान पुणे येथून चार सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दीपक बाबासाहेब ढेंगे, दत्ता अर्जुन कदम, आकाश सुभाष ओंबे आणि अशोक लक्ष्मण बेंद्रे यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तपासात आरोपींवर पुणे, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी, दरोडा तसेच गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यातील मुख्य आरोपी दीपक ढेंगे याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही कारवाई झालेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

Next Post

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

Related Posts

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान
सोलापूर जिल्हा

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
Next Post
महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025