Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आचारसंहितेमुळे ‘मिनी मंत्रालय’ ओस पडले

Solapur Mirror by Solapur Mirror
June 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आचारसंहितेमुळे ‘मिनी मंत्रालय’ ओस पडले
0
SHARES
1
VIEWS

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत शुकशुकाट; सदस्य- पदाधिकारी प्रचारात व्यस्त

सोलापूर | मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेत विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत असून, संपूर्ण परिसरात शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्याचा पहिला दिवस असलेल्या सोमवारीही जिल्हा परिषदेत नेहमीची वर्दळ दिसून आली नाही.

विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे ६८ सदस्य मतदार असल्याने विविध उमेदवारांकडून त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे अनेक सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांच्यात थेट लढत होत असून, दोन्ही उमेदवारांनी मतदार संपर्क मोहीम वेगवान केली आहे. आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेत नवीन विकासकामांना मंजुरी देता येत नसल्याने तसेच धोरणात्मक निर्णयांवर निर्बंध आल्याने पदाधिकारीदेखील सक्रिय दिसत नाहीत. परिणामी, जिल्हा परिषदेत सध्या केवळ नियमित प्रशासकीय कामकाज सुरू असून राजकीय हालचाली जवळपास ठप्प झाल्या आहेत.

पदाधिकारी आणि सदस्य निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने कार्यकर्त्यांनीही जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवली आहे. १८ जून रोजी मतदान आणि त्यानंतर मतमोजणी होणार असल्याने २६ जूननंतरच जिल्हा परिषदेत पुन्हा राजकीय वर्दळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

६१६ मतदारांवर उमेदवारांची बारीक नजर
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत एकूण ६१६ मतदार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, पंचायत समिती सभापती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत असून उमेदवारांकडून मतदारांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

Tags: देवेंद्र फडणवीसराजकारणसोलापूर
Previous Post

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दिलासा ; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next Post

भरधाव दुचाकीचा घात; अपघातात आईचा मृत्यू

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
भरधाव दुचाकीचा घात; अपघातात आईचा मृत्यू

भरधाव दुचाकीचा घात; अपघातात आईचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025