Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

Solapur Mirror by Solapur Mirror
June 15, 2026
in Uncategorized
0
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
0
SHARES
34
VIEWS

सोलापूर | उत्तर सोलापूर तालुक्यातील अंबिका नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला प्रवेशोत्सव सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रवेशोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले. यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, स्कूल बॅग, गणवेश, शूज आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक आनंद भवर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी सजविलेल्या जीपमधून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. यामुळे शाळा परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त एम. राजकुमार म्हणाले, “विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मनापासून अभ्यास करणे आवश्यक आहे. पुस्तकांना मित्र बनवा. सरकारी शाळेत शिक्षण घेऊन अनेकजण मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आजचा प्रवेशोत्सवाचा दिवस भविष्यात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” या कार्यक्रमास नगरसेविका अलका आनंद भवर, चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस उपनिरीक्षक आनंद भवर, सतीश बावणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा लक्ष्मी कनकधर, उपाध्यक्षा प्रज्ञा राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धाराम माशाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवशंकर राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन रसिका बंदिछोडे यांनी केले. प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दीपक काळे, वैशाली गोंदकर, विद्या वरडुळे आणि शिवाजी वडते यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

सीसीटीव्हीच्या धाग्याने तेलंगणात गाठले कारचोर; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांनी कागदपत्रे तातडीने जमा करावीत
Uncategorized

स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांनी कागदपत्रे तातडीने जमा करावीत

June 13, 2026
Next Post
नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

नवागत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025