Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“धमकीच्या आरोपानंतर पत्रकार संघटना आक्रमक; कारवाईसाठी जोरदार आंदोलन”

Solapur Mirror by Solapur Mirror
June 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“धमकीच्या आरोपानंतर पत्रकार संघटना आक्रमक; कारवाईसाठी जोरदार आंदोलन”
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर : पत्रकारांना धमकीची भाषा वापरल्याचा आरोप करत सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोलापुरातील पत्रकारांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अरेरावीची भाषा वापरत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी एकत्र येत सोलापुरात आंदोलन केले.निदर्शनादरम्यान पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करण्याची हमी द्यावी, अशी मागणी केली. स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचे संरक्षण करणे ही लोकशाहीची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पत्रकारांबाबत संवेदनशील आहे. मात्र पत्रकारांना धमकावणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने व संयमाने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रिया देत श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी लोकशाहीत पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणे महत्त्वाचे आहे. प्रश्न विचारणे त्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या घटनेची नोंद घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी.अशा प्रकारच्या घटनांमुळे पत्रकारांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून शासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी मागणी श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी केली.

या आंदोलनात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा , डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सोलापूर अध्यक्ष विकास कस्तुरे, कृष्णकांत चव्हाण, प्रीतम पंडित, अनिकेत गायकवाड, सौरभ वाघमारे, रवी ढोबळे, विनोद हुमनाबादकर, विक्रांत कालेकर, अनिल कांबळे, इरण्णा जुजगार , इरफान शेख, दीपक शिराळकर , लक्ष्मीकांत शिंदे, तौसीफ शेख, यासीन शेख यांच्यासह विविध पत्रकार संघटनेचे पत्रकार, कॅमेरामन व माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.—-

Previous Post

राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारातुनच समताधिष्ठीत समाज निमिर्ती शक्य- डॉ. गव्हाणे

Next Post

स्व. दीनानाथ कमळे गुरुजींच्या स्मृतींना उजाळा; पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या लोकार्पण

Related Posts

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
Next Post
स्व. दीनानाथ कमळे गुरुजींच्या स्मृतींना उजाळा; पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या लोकार्पण

स्व. दीनानाथ कमळे गुरुजींच्या स्मृतींना उजाळा; पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025