
सोलापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदेत अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी शिक्षणाधिकारी कादर शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी कोपुरवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्यासह कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, पदाधिकारी कल्याण श्रावस्ती, धन्यकुमार राठोड, उमाकांत राजगुरू तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि बहुजन कल्याणासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने जपण्याचे आवाहन करण्यात आले.













