No Result
View All Result
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत सोहळ्यात आसनव्यवस्थेतील गोंधळामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमातच सिनेट सदस्यांना राखीव जागा उपलब्ध न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त करत सभागृहातच जमिनीवर ठिय्या आंदोलन केले.
सोहळ्यासाठी सिनेट सदस्यांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्या जागांवर अन्य व्यक्ती बसल्याचे निदर्शनास आले. याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही योग्य दखल घेतली गेली नाही. उलट सदस्यांना उभे राहण्याचा सल्ला देण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले. यामुळे सिनेट सदस्य संजय साळुंखे, यतिराज होनमाने आणि सुदर्शन यादव यांनी निषेध म्हणून सभागृहातच जमिनीवर बसून आंदोलन सुरू केले. हा प्रकार सुरू असतानाच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांचेही लक्ष या घटनेकडे वेधले गेले. काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले
विशेष म्हणजे, यापूर्वी विद्यापीठाच्या युवा महोत्सवातही आसनव्यवस्थेवरून व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. वारंवार अशा घटना घडत असल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यक्रम नियोजनावर प्रश्न उपस्थित होत असून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
No Result
View All Result