Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सरवदे हत्याकांड : भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

Solapur Mirror by Solapur Mirror
August 6, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सरवदे हत्याकांड : भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

सोलापूर, दि. ६ : मनसे विद्यार्थी सेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी आणि भाजपच्या नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मेहरूज पठाण यांनी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.या प्रकरणात सुरुवातीला दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर शालन शिंदे यांनी ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती आणि फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती असल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला. या बाबींचा विचार करून न्यायालयाने शालन शिंदे यांना जामीन मंजूर केला.बाळासाहेब सरवदे हत्येचा गुन्हा २ जानेवारी २०२६ रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, शालन शिंदे व इतर आरोपींनी रेखा सरवदे यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता.

त्याच दिवशी सायंकाळी हनुमान मंदिर परिसरात बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या घटनेत शालन शिंदे व अन्य आरोपींची नावे गुन्ह्यात नमूद करण्यात आली होती.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. ए. ए. टक्कळकर यांनी, तर आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने शालन शिंदे यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Previous Post

“वाद नको, शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हवा!” – इंद्रजीत पवारांची स्पष्ट भूमिका

Next Post

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’;  नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

आमदार निधीचा विकास ‘ऑन ग्राऊंड’; नगरसेवक दीपक जमादार यांच्या कामाची पोच पावती..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In