Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ऑर्किड स्कूलच्या बालवैज्ञानिकांची अंतराळाला गवसणी!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ऑर्किड स्कूलच्या बालवैज्ञानिकांची अंतराळाला गवसणी!

विज्ञान प्रदर्शनात ४९० विद्यार्थ्यांनी साकारले मंगळ, चंद्र मोहिमांसह रोबोटिक्सचे जिवंत मॉडेल्स

सोलापूर : नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आयोजित भव्य विज्ञान प्रदर्शनात तब्बल ४९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अंतराळ मोहिमा, मंगळ ग्रह व चंद्र मोहीम, भविष्यातील रोबोटिक्स तंत्रज्ञान तसेच स्वयंचलित उपकरणांची एकापेक्षा एक सरस जिवंत मॉडेल्स सादर केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधन वृत्तीला मिळालेल्या या व्यासपीठामुळे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. लक्ष्मण करळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी तुकाराम चंद्रकांत साळुंखे, क्रांतिवीर शिवराम महिंद्रकर, डॉ. अशोक सोरगावी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार करजगी, शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी आणि मार्गदर्शिका मीना पारखे उपस्थित होते.

यावेळी डॉ. लक्ष्मण करळे यांनी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) योग्य वापर करून आपल्या संशोधन वृत्तीला चालना द्यावी आणि अशा विज्ञान प्रदर्शनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी आणि संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक कल्पना व सादरीकरणाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनापासून भविष्यातील रोबोट्सपर्यंत विविध संकल्पनांवर आधारित मॉडेल्स साकारली. त्यांच्या कल्पकता, आत्मविश्वास आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने उपस्थित पालक व मान्यवरांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सान्वी चव्हाण व संज्ञा मोहिते यांनी केले. प्रदर्शनास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. ‘विज्ञान केवळ पुस्तकात नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे,’ अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारलेल्या रोबोट्सच्या प्रभावी सादरीकरणाने विज्ञान प्रदर्शनाची सांगता झाली.

Previous Post

यंदाच्या वारीत जाहिरातींवर दोन कोटींचा खर्च… पहा आकडेवारी

Next Post

पंढरपूरला पहिल्या अपर पोलिस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
पंढरपूरला पहिल्या अपर पोलिस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे!

पंढरपूरला पहिल्या अपर पोलिस अधीक्षकपदी प्रेरणा कट्टे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In