No Result
View All Result
सोलापूर : हॉटगी रोड येथील चव्हाण मोटर्सच्या शोरूममध्ये मारुती सुझुकीच्या नव्या ब्रेझा मॉडेलचे दिमाखदार अनावरण आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या ब्रेझाच्या लॉन्चिंगनिमित्त ऑटोमोबाईल क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक आणि चव्हाण मोटर्स परिवाराची मोठी उपस्थिती होती.यावेळी चव्हाण मोटर्सचे शिवप्रकाश ऊर्फ बाबू चव्हाण यांनी संस्थेच्या ३५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.
ग्राहकांचा विश्वास आणि दर्जेदार सेवा यांच्या बळावर चव्हाण मोटर्सने ऑटोमोबाईल क्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण केले असून, देशातील २० सर्वोत्तम उद्योजकांमध्ये चव्हाण मोटर्सचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे संस्थेच्या माध्यमातून तब्बल १२०० तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.चव्हाण परिवार आणि कोठे परिवारातील अनेक वर्षांचा ऋणानुबंध यावेळी अधोरेखित करण्यात आला. स्वर्गीय विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे आणि स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्याशी असलेल्या संबंधांपासून सुरू झालेला हा स्नेहसंबंध आता तिसऱ्या पिढीतही कायम असल्याचा उल्लेख शिवप्रकाश चव्हाण यांनी केला.आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणात मारुती सुझुकीच्या ग्राहकविश्वासासोबतच चव्हाण मोटर्सनेही सेवा आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याचे नमूद केले.
परवडणारी किंमत, चांगले मायलेज, कमी देखभाल खर्च, सहज उपलब्ध होणारी सर्व्हिस व सुटे भाग तसेच चांगली पुनर्विक्री किंमत यामुळे मारुती सुझुकीच्या वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.चव्हाण मोटर्सने यापूर्वी विक्री क्षेत्रात अनेक विक्रम नोंदविले असून, भविष्यातही संस्थेने नवे विक्रम प्रस्थापित करावेत. त्यासोबतच सोलापूर शहराचीही अशीच प्रगती होत राहावी, अशी अपेक्षा कोठे यांनी व्यक्त केली.महापौर विनायक कोंड्याल यांनीही चव्हाण मोटर्सच्या व्यावसायिक वाटचालीचे कौतुक करत ग्राहकसेवा आणि विश्वासार्हतेच्या जोरावर संस्थेने निर्माण केलेले स्थान उल्लेखनीय असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन ममता बोल्ली-गोरंटला यांनी केले. पुरुषोत्तम चव्हाण यांनी आभार मानले. नव्या ब्रेझाच्या लॉन्चिंगनिमित्त चव्हाण मोटर्सच्या शोरूममध्ये उत्साहाचे वातावरण होते.
No Result
View All Result