Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सिद्धेश्वर मंदिरासह प्रमुख मंदिरांत भाविकांची अलोट गर्दी

Solapur Mirror by Solapur Mirror
August 17, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सिद्धेश्वर मंदिरासह प्रमुख मंदिरांत भाविकांची अलोट गर्दी
0
SHARES
20
VIEWS

सोलापूर : ​श्रावण महिन्याची सुरुवात होताच सोलापूर नगरी हरहर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. आज पहिल्या श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा योग एकाच दिवशी आल्याने सोलापूरकरांच्या आनंदाला व भक्तीला उधाण आले आहे. पहाटेपासूनच शहरातील प्रमुख शिव मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे., ‘ओम नमः शिवाय’च्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे.

​शहरातील आराध्य दैवत श्रीशिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरामध्ये पहाटे ४:३० ते रात्री १२:३० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सकाळी ७:०० वाजता श्री सिद्धेश्वर महाराज पुराण, रुद्राभिषेक व अभिषेक सोहळा पार पडला. सकाळी ८:३० वाजता योग समाधीजवळ सामूहिक ‘ॐ नमः शिवाय’ जपाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १० वाजता आकर्षक पालखी सोहळा, विशेष पूजा व सजावट संपन्न होणार असून पहिल्या शिवमुठीचा (तांदूळ) महापूजेचा मान पुजारी शिवशंकर हब्बू यांच्याकडे आहे.

तसेच, बळीवेस आणि अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ हॉटगी मठातील पंचमुखी परमेश्वर मंदिरात सकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक, रुद्राभिषेक, गंगा आरती व भस्म आरती संपन्न झाली. काशीपीठ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामींचे तपोनुष्ठान आणि सकाळी ९ नंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. पहिल्या श्रावण सोमवाराचे औचित्य साधून महिलांची गर्दी विशेष उल्लेखनीय ठरली असून, सर्वांनी मनोभावे शिवाची पूजा करत बिल्वपत्रांची अर्पण केली.

​तसेच, बाळीवेस येथील प्रसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरातही विविध धार्मिक विधी पार पडत आहेत. पहाटे काकडा आरतीनंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत रुद्राभिषेक व १०८ नामावली पठन झाले. याशिवाय ११ लिटर उसाचा रस व दुधाचा अभिषेक, ६४ किलो तांदूळ, ५ किलो मसूर आणि ५ किलो मुगाची ‘अक्कीपूजा’ करण्यात आली. रात्री ८ वाजता मंदिराचा पालखी सोहळा व नंदीध्वज मिरवणूक निघणार असल्याची माहिती विनोद हिरेहब्बू यांनी दिली.

योग समाधीस फुलांची मनोहारी सजावट
​पहिल्या श्रावण सोमवाराचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीला रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास अत्यंत आकर्षक आणि मनोहारी फुलांची सजावट करण्यात आली. ही भव्य सजावट साकारण्यासाठी तब्बल १६ कारागीरांनी परिश्रम घेतले आहेत.

​या विशेष सजावटीसाठी ​झेंडू: ४०० किलो ​
गुलाब: १०० किलो, ​शेवंती: साडेतीनशे किलो, गुलछडीसह विविध सुवासिक फुलांचा वापर करण्यात आला आहे. ​भारत फ्लॉवर स्टॉलचे मंजुनाथ तेलसंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही योग समाधीची सजावट केली असून, भांड्याचे व्यापारी चंद्रकांत बाळी यांनी ती श्रीचरणी अर्पण केली आहे. पहिल्या श्रावण सोमवार व नागपंचमीच्या योगावर योग समाधीचे हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Previous Post

तटकरे परिवाराशी जुने ऋणानुबंध ; किसन जाधव यांच्याकडून ‘अस्सल सोलापुरी’ सन्मान

Next Post

श्री तोगटवीर शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
श्री तोगटवीर शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

श्री तोगटवीर शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In