Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यश

Solapur Mirror by Solapur Mirror
August 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यश

शब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

सोलापूर : गेल्या ३४ वर्षांपासून मोची समाजाकडून होत असलेल्या शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी मंजूर करण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेषतः लष्कर आणि परिसरात प्रामुख्याने असलेल्या मोची समाजाच्या गोरगरीब कामगारांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी याकरिता श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला येथील जागा शाळेकरीता द्यावी अशी मागणी समाजाच्यावतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे करण्यात आली होती.

त्यांची ही मागणी विचारात घेऊन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. आमदार देवेंद्र फडणीस यांच्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला ही जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी हा भूखंड मिळवण्यासाठी मोची समाजातील अनेकांनी तत्कालीन आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती. परंतु हा प्रश्न सुटला नव्हता. आमदार देवेंद्र कोठे यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडल्यानंतर मात्र या विषयाला गती आली.सोलापूर उत्तर सदर बझार येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली ३ हजार ९१० चौ.मी. जागा श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाला शैक्षणिक कारणासाठी २३४६ चौरस मीटर क्षेत्र प्रचलित बाजारमूल्याच्या वीस टक्के रक्कम घेऊन कब्जे हक्काने देण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडांगणासाठी १५४६ चौरस मीटर क्षेत्र वर्षाला एक रुपया नाममात्र दराने तीस वर्षासाठी भाडेपट्ट्याने देण्यास मान्यता देण्यात आली.मात्र हा भूखंड़ देताना राज्य शासनाने काही अटी आणि शर्तीही घातल्या आहेत. या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करता येणार आहे. जमिनीचा ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी वापर सुरू करणे बंधनकारक आहे.

महसूल विभागाचे क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सोलापूरला पुन्हा प्रत्यंतरमहसूल विभागाचे क्रांतिकारी निर्णयमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेत आहेत. याचे या निर्णयाच्या निमित्ताने सोलापूरकरांना पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. बी टू च्या ऐतिहासिक निर्णयानंतर १९९२ पासून रखडलेला मोची समाजाचा शैक्षणिक विषयातील प्रश्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गी लावला आहे. कष्टकरी, मागासवर्गीय प्रवर्गातील मोची समाजाच्या शैक्षणिक कामासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक चांगले विद्यार्थी घडणार आहेत.

मोची समाजाने व्यक्त केला आनंद : आजवर मोची समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेण्यात आला. मात्र गोरगरीब मोची समाजाला न्याय मिळाला नाही. मोची समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता महाराष्ट्राचे विकासाभिमुख मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र हा विषय मार्गी लावून मोठी समाजाच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे, असे म्हणत या निर्णयाबद्दल मोची समाजातील समाजधुरिणांनी एकत्र येत आनंद उत्सव साजरा केला.

मोची समाजाला दिलेल्या शब्दपूर्तीचे समाधानमोची समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द मी विधानसभा निवडणुकीप्रसंगी दिला होता. यातीलच एक टप्पा म्हणजे हा निर्णय आहे. सोलापूर शहरात मोची समाजासह गोरगरीब कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. त्यांच्या पाल्यांच्या उत्तम शिक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचे शिक्षण उत्तम होण्यासाठी आवश्यक सर्व मदत शासनाच्यावतीने मिळवून देण्यात येईल.– देवेंद्र कोठे, आमदार, शहर

Tags: आमदार देवेंद्र कोठेदेवेंद्र फडणवीससोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

भाजपचे ‘मिशन लोकल बॉडी’! सोलापुरात पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गजांची खलबते

Next Post

१८ दिवसांत ११५ तपासण्या; १३ गुन्हे दाखल, ४ वाहने जप्त ; भेसळखोरांवर FDA ची विशेष कारवाई

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
१८ दिवसांत ११५ तपासण्या; १३ गुन्हे दाखल, ४ वाहने जप्त ; भेसळखोरांवर FDA ची विशेष कारवाई

१८ दिवसांत ११५ तपासण्या; १३ गुन्हे दाखल, ४ वाहने जप्त ; भेसळखोरांवर FDA ची विशेष कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In