Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अखेर आकुलवारांची बदली, नगर अभियंता पदाचा ‘चार्ज’ मठपतींकडे!

Solapur Mirror by Solapur Mirror
August 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अखेर आकुलवारांची बदली, नगर अभियंता पदाचा ‘चार्ज’ मठपतींकडे!

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रभारी नगर अभियंता सारिका आकुलवार यांची बदली झाल्याने नगर अभियंता पदाचा कार्यभार मठपती यांच्याकडे सोपविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले आहेत.

नगर अभियंता हे महापालिकेतील विकासकामांच्या तांत्रिक मंजुरीपासून विविध विभागांमधील प्रशासकीय समन्वयापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे पद आहे. त्यामुळे हे पद कार्यभाराविना राहू नये, यासाठी प्रशासनाने मठपती यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत अतिरिक्त पदभार सोपविला आहे. आता नगर अभियंता पदाशी संबंधित तांत्रिक व प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी मठपती यांच्याकडे राहणार आहे.दरम्यान, महापालिकेतील बहुचर्चित नालेसफाई कामातील कथित गैरप्रकाराच्या चौकशी अहवालाच्या पार्श्वभूमीवर आकुलवारांची बदली आणि नगर अभियंता पदाचा बदललेला कार्यभार चर्चेचा विषय ठरला आहे.

नालेसफाई प्रकरणाच्या चौकशी अहवालात सारिका आकुलवार यांच्यासह तब्बल १९ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.अवाजवी दरांना तांत्रिक मंजुरी, विभागांमधील आवश्यक समन्वयाचा अभाव, लॉगबुक व बिलांच्या तपासणीत त्रुटी तसेच महापालिकेच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचेल अशा पद्धतीने कामकाज झाल्याचे गंभीर निरीक्षण चौकशी समितीने नोंदविले आहे.

चौकशी अहवालानंतर संबंधित: अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील पुढील प्रशासकीय कारवाईकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अनंत जाधवांच्या मागणीला पार्श्वभूमी : नालेसफाई प्रकरणाचे तक्रारदार भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत सारिका आकुलवार यांना नगर अभियंता पदापासून दूर ठेवण्याची मागणी केली होती. चौकशी अहवालात आकुलवार यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू होती. त्यातच आता त्यांची बदली झाल्याने आणि नगर अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार मठपतींकडे सोपविण्यात आल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मठपतींकडे कारभार; पुढील कारवाईकडे लक्ष : मठपती यांच्या नियंत्रणाखाली नगर अभियंता विभागाचे कामकाज सुरू झाल्यानंतर नालेसफाई प्रकरणातील पुढील प्रशासकीय कारवाईलाही वेग येण्याची शक्यता आहे. कारणे दाखवा नोटिसा, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि गंभीर प्रकरणांत विभागीय चौकशी यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.आकुलवारांची बदली आणि त्यानंतर नगर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार मठपतींकडे देण्यात आल्याने महापालिका प्रशासनातील या घडामोडीकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

रुग्णांच्या डोळ्यांवर उपचार अन् सुई-धाग्यांतून कलाकृती; डॉ. उमा प्रधान यांचा अनोखा कलाप्रवास!

Next Post

पाण्यासाठी सोलापूरकरांचे ‘एक पाऊल पुढे’; ५ हजार ११५ जणांचा ‘वॉक फॉर वॉटर’!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
पाण्यासाठी सोलापूरकरांचे ‘एक पाऊल पुढे’; ५ हजार ११५ जणांचा ‘वॉक फॉर वॉटर’!

पाण्यासाठी सोलापूरकरांचे ‘एक पाऊल पुढे’; ५ हजार ११५ जणांचा ‘वॉक फॉर वॉटर’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In