सोलापूर : वारकरी संप्रदायातील अध्यात्म, संस्कार आणि शिक्षणाची परंपरा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

या संस्थेचे उद्घाटन ह.भ.प. गुरुवर्य सुधाकरजी महाराज इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वारकरी परंपरेतील संस्कार, संत साहित्याचे महत्त्व आणि युवकांमध्ये अध्यात्मिक मूल्ये रुजविण्याची गरज अधोरेखित केली. समाजामध्ये नैतिकता, सदाचार आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्यासाठी अशा संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.










