सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व खारभूमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त भरतशेठ गोगावले युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर शहरातील ज्ञानसागर हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.भरतशेठ गोगावले युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आशिष जेटिथोर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाला सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, युवा उद्योजक मदन वडावराव तसेच युवासेना शहर मध्य संपर्कप्रमुख ऋषिकेश घोलप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.


हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक अभिजीत शिरसे, निशांत गायकवाड, राकेश माने, सिद्धार्थ सोनवणे, पंडित गायकवाड यांच्यासह भरतशेठ गोगावले युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी ज्ञानसागर हायस्कूलच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत भरतशेठ गोगावले युवा प्रतिष्ठान आणि संस्थापक अध्यक्ष आशिष जेटिथोर यांचे आभार मानले. तसेच मंत्री भरतशेठ गोगावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या.











