सोलापूर ; दिलीपराव माने साहेब हे केवळ एक राजकीय नाव नसून सोलापूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राचा कायापालट करणारे एक दूरदृष्टीचे आणि कर्तव्यदक्ष नेतृत्व आहे. लोकनेते स्वर्गीय ब्रह्मदेवदादा माने यांच्या विचारांचा वसा समर्थपणे पुढे नेताना त्यांनी सत्तेला नेहमीच लोकसेवेचे आणि परिवर्तनाचे माध्यम मानले आहे. आपल्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सार्वजनिक जीवनात त्यांनी BMIT सारख्या दर्जेदार शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च व तंत्रशिक्षणाची द्वारे खुली करून दिली, तर दुसरीकडे सिद्धनाथ साखर कारखाना, ब्रहादेवदादा माने सहकारी बँक आणि सोलापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, गिरणी कामगार व नवउद्योजकांना भक्कम आर्थिक आधार दिला.
विशेषतः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार सांभाळताना त्यांनी घेतलेले क्रांतिकारक निर्णय बळीराजाला खऱ्या अर्थाने न्याय देणारे ठरले आहेत; आधुनिक बेदाणा मार्केटची उभारणी, परदेशी बाजारपेठांचा शोध, पारदर्शकतेसाठी बसवलेले इलेक्ट्रॉनिक काटे, सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा, रात्रीचे भाजीपाल्याचे लिलाव आणि दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अवघ्या एका रुपयात ‘ब्रम्हपूर्णा’ भोजन योजना यांमुळे सोलापूरची बाजार समिती डाळिंब व कांदा व्यापारात संपूर्ण देशात अग्रेसर बनली. राजकारणात अनेक चढ-उतार आणि विरोधकांनी उभारलेली अग्निदिव्ये आली तरीही खचून न जाता, केवळ जनतेचे अथांग प्रेम आणि अढळ विश्वासाच्या जोरावर ते प्रत्येक कसोटीवर यशस्वीपणे उतरले आहेत. सौ. जयश्रीताई व डॉ. पृथ्वीराज यांची भक्कम साथ लाभलेले माने साहेब नेहमीच सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी थेट जोडलेले राहिले आहेत.
समाजातील प्रत्येक घटकाला पाठीशी घालणारे, हाताला काम देणारे आणि मायेची सावली धरणारे हे सर्वसमावेशक नेतृत्व भविष्यात अधिक मोठ्या पदावर विराजमान होऊन महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देईल, यात शंका नाही